Homeटॉप स्टोरी... तर आम्ही...

… तर आम्ही केलेला कायदा उच्च न्यायालयात कसा टिकला?

लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नसता तर आमच्या सरकारने पारित केलेला कायदा उच्च न्यायालयात कसा काय टिकला असता, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणावरील चर्चेत केला. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाने आपण केलेला कायदा अवैध ठरवलेला आहे, ही आज स्थिती आहे. त्यावर क्युरेटिव्ह पिटिशन आपल्या सरकारने केलेली आहे आणि त्यात आपल्याला यश आले तर आमच्या शुभेच्छाच आहेत.

मराठा आरक्षणारून पृथ्वीराज चव्हाण आणि देवेन्द्र फडणीस यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली. केंद्र सरकारच्या १०२व्या घटनादुरुस्तीबद्दल तुम्ही जाणूनबुजून चुकीचा अन्वयार्थ सभागृहासमोर मांडत आहात कारण तुम्हाला सर्व काही माहीत असूनही राजकीय भाषण करायचे आहे, असे सांगत फडणवीस यांनी चव्हाण यांचे मुद्दे खोडून काढले.

कायदा

विधानसभेत मंगळवारी रात्री मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर ठपका ठेवत आरोप केला की, तुम्ही २०१८मध्ये मराठा आरक्षण विधेयक आणले, तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगावे की तुम्हाला वैधानिक अधिकार होता का… केंद्र सरकारच्या १०२व्या घटनादुरुस्तीमुळे एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राने जुलै २०१८पासून काढून घेतला होता. त्यामुळे ते विधेयक आणण्याचा अधिकार तुम्हाला होता का… त्यावर फडणवीस यांनी हस्तक्षेप करून सभागृहाला सांगितले की, १०२वी घटनादुरुस्ती ही राज्यामध्ये असलेल्या मागास आयोगाला घटनात्मकता नव्हती ती देण्यासाठी केलेली होती. तसे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. यासंदर्भातील संदिग्धता दूर करण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र केंद्राने दिले आणि पुढे १०५वी घटनादुरुस्तीही केली. पण पृथ्वीराज चव्हाण यांना हे सर्व माहीत असले तरी त्यांना राजकीय भाषण करायचे असल्याने ते मुद्दाम ते तसे मांडत आहेत.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content