Homeटॉप स्टोरीउद्धव राजवटीपासूनचे शिवछत्रपती...

उद्धव राजवटीपासूनचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर   

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यापासून रखडलेले राज्याचे सन 2019-20, 2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार काल क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर काही तासांतच महाजन यांच्याकडील क्रीडा खात्याचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत वाड (ठाणे), सन २०२०-२१ दिलीप वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल सुमारीवाला (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

विविध पुरस्कार पुढीप्रमाणे

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता पुरस्कार सन 2019-20

जिम्नॅस्टीक्स- डॉ. आदित्य जोशी, औरंगाबाद

सॉफ्टबॉल- दर्शना पंडित, नागपूर

खो-खो- शिरीन गोडबोले, पुणे

दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक- संजय भोसकर, नागपूर

थेट पुरस्कार- कबड्डी- प्रशांत चव्हाण, ठाणे

थेट पुरस्कार- कबड्डी- प्रताप शेट्टी, ठाणे

थेट पुरस्कार- कबड्डी- अमरसिंह निंबाळकर, पुणे

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता पुरस्कार सन 2020-21

जिम्नॅस्टीक्स- संजोग ढोले, पुणे

स्केटिंग- राहुल राणे, पुणे

सॉफ्टबॉल- डॉ. अभिजित इंगोले, अमरावती

दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक- विनय साबळे, औरंगाबाद

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता पुरस्कार सन 2021-22

जिम्नॅस्टीक्स- सिद्धार्थ कदम, औरंगाबाद

धनुर्विद्या- चंद्रकांत इलग, बुलढाणा

सॉफ्टबॉल- किशोर चौधरी, जळगाव

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2019-20

आर्चरी- स्नेहल मांढरे, सातारा

ॲथलेटिक्स- पारस पाटील, पुणे. अंकिता गोसावी, पुणे

आट्यापाट्या- विजय न्हावी, जळगाव. शीतल शिंदे, उस्मानाबाद

बॅडमिंटन- तन्वी लाड, मुंबई उपनगर (थेट पुरस्कार)

बॉक्सिंग- सौरभ लेणेकर, मुंबई उपनगर

सायकलिंग- प्रणिता सोमण, अहमदनगर

तलवारबाजी- जय शर्मा, नाशिक

कबड्डी- सायली जाधव, मुंबई उपनगर

कयाकिंग-कनॉईंग- सागर नागरे, नाशिक

खोखो- प्रतिक वाईकर, पुणे. आरती कांबळे, रत्नागिरी

मल्लखांब- दीपक शिंदे, मुंबई उपनगर (थेट पुरस्कार). प्रतीक्षा मोरे, कोल्हापूर (थेट पुरस्कार)

पॉवरलिप्टींग- नाजूका घारे, ठाणे

शूटींग- भक्ती खामकर, ठाणे

स्केटिंग- अरहंत जोशी, पुणे. श्रुतिका सरोदे, पुणे

सॉफ्टबॉल- अभिजित फिरके, अमरावती. हर्षदा कासार, पुणे

स्पोर्टस क्लायबिंग- सिध्दी मणेरीकर, मुंबई उपनगर

जलतरण- मिहीर आंब्रे, पुणे. साध्वी धुरी, पुणे

डायव्हींग/वॉटरपोलो- मेधाली रेडकर, मुंबई उपनगर

वेटलिप्टींग- अश्विनी मळगे, कोल्हापूर

कुस्ती- सोनबा गोंगाणे, पुणे. सोनाली तोडकर, बीड

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2020-21

आट्यापाट्या- विशाल फिरके, जळगाव. शीतल ओव्हाळ, उस्मानाबाद

शूटिंग- यशिका शिंदे, मुंबई शहर

सॉफ्टबॉल- स्वप्नाली वायदंडे, कोल्हापूर

बेसबॉल- रेश्मा पुणेकर, पुणे

वुशू– मिताली वाणी, पुणे

सायकलिंग- सूर्या थटू, पुणे. प्रियांका कारंडे, सांगली

अश्वारोहण- अजय सावंत, पुणे (थेट पुरस्कार)

कबड्डी- निलेश साळुंके, ठाणे. मीनल जाधव, मुंबई उपनगर

खोखो- अक्षय भांगरे, मुंबई उपनगर. प्रियंका भोपी, ठाणे

स्केटिंग- अथर्व कुलकर्णी, पुणे. आदिती धांडे, नागपूर

टेबल टेनिस- सिध्देश पांडे, ठाणे

पॉवरलिफ्टींग- श्रेया बोर्डवेकर, मुंबई शहर

कॅरम- अनिल मुंढे, पुणे

जलतरण- ऋतुजा तळेगावकर, नागपूर

कुस्ती- सूरज कोकाटे, पुणे. कोमल गोळे, पुणे

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2021-22

आर्चरी- मयूर रोकडे, सांगली. मोनाली जाधव, बुलढाणा

ॲथलेटिक्स- सर्वेश कुशारे, नाशिक

आट्यापाट्या- अजित बुरे, वाशिम. वैष्णवी तुमसरे, भंडारा

बॅडमिंटन- मालविका बनसोड, नागपूर

बॉक्सिंग- हरिवंश टावरी, अकोला

बेसबॉल- अक्षय आव्हाड, अहमदनगर. मंजुषा पगार, नाशिक

शरिरसौष्ठव- राजेश इरले, पुणे

कनोईंग व कयाकिंग- देवेंद्र सुर्वे, पुणे

बुध्दीबळ- संकल्प गुप्ता, नागपूर (थेट पुरस्कार)

सायकलिंग- मयुरी लुटे, भंडारा

तलवारबाजी- अभय शिंदे, औरंगाबाद. वैदेही लोहिया, औरंगाबाद

लॉन टेनिस- अर्जुन कढे, पुणे

जिम्नॅस्टिक-एरोबिक- ऋग्वेद जोशी, औरंगाबाद

खोखो- अक्षय गणपुले, पुणे. अपेक्षा सुतार, रत्नागिरी

पॉवरलिफ्टींग- साहील उतेकर, ठाणे. सोनल सावंत, कोल्हापूर

रोईंग- निलेश धोंडगे, नाशिक

रग्बी- भरत चव्हाण, मुंबई शहर

शूटिंग- अभिज्ञा पाटील, कोल्हापूर

स्केटिंग- यश चिनावले, पुणे. कस्तुरी ताम्हणकर, नागपूर

सॉफ्टबॉल- सुमेध तळवेलकर, जळगाव

स्पोर्टस क्लायबिंग- ऋतिक मारणे, पुणे

जलतरण- ज्योती पाटील, मुंबई शहर

वेटलिफ्टींग- संकेत सलगर, सांगली

कुस्ती- हर्षवर्धन सदगीर, पुणे. स्वाती शिंदे, कोल्हापूर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०१९-२०

अ‍ॅथलेटिक्स- योगेश्वर घाटबांधे. भाग्यश्री माझिरे

व्हीलचेअर बास्केटबॉल- मीन बहादूर थापा

बॅडमिंटन- आरती पाटील

बुद्धीबळ- मृणाली पांडे

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२०-२१

जलतरण- दीपक पाटील. वैष्णवी जगताप

व्हीलचेअर बास्केटबॉल- सुरेश कार्की

पॅरा आर्चरी- मिताली गायकवाड

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२१-२२

अ‍ॅथलेटिक्स- प्रणव देसाई. आकुताई उलभगत

व्हीलचेअर बास्केटबॉल- अनिल काची

व्हीलचेअर तलवारबाजी- अनुराधा सोळंकी

थेट पुरस्कार-अ‍ॅथलेटिक्स- भाग्यश्री जाधव

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी) सन 2019-20

जल- सागर कांबळे

जमीन- कौस्तुभ राडकर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी) सन 2020-21

जमीन- कृष्ण प्रकाश

थेट पुरस्कार – केवल कक्का – तेनझिंग नॉर्गे पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी) सन 2021-22

जमीन- जितेंद्र गवारे

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content