Homeएनसर्कलउत्तर प्रदेशातले शेखा...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!


केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे.

“उत्तर प्रदेशने हा आकडा 99वर नेला! शेखा झील पक्षी अभयारण्याला (अलिगढ, उत्तर प्रदेश) ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती देताना आनंद होत आहे”, असे यादव यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. या घोषणेमुळे स्थानिक उपजीविका आणि जागतिक जैवविविधता, तसेच जल आणि हवामान सुरक्षेला चालना मिळेल. भारताचा 99 हा आकडा आपल्याला ऐतिहासिक शतकाच्या अधिक जवळ घेऊन जातो, असे ते म्हणाले. ‘शेखा झील’ हे ‘मध्य आशियाई उड्डाणमार्गा’वरील एक अत्यंत महत्त्वाचे विश्रामस्थळ आहे. हिवाळ्याच्या हंगामात ‘बार-हेडेड गूज’, ‘पेंटेड स्टॉर्क’ आणि विविध प्रकारच्या बदकांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे स्थळ एक महत्त्वाचा अधिवास उपलब्ध करून देते. लोकांनी या स्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

रामसर स्थळे, ही रामसर अधिवेशनांतर्गत नियुक्त केलेली आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ क्षेत्रे आहेत. हे अधिवेशन १९७१ साली इराणमधल्या रामसर येथे झाले होते. तेथे स्वीकारण्यात आलेला हा एक आंतरशासकीय करार आहे. हे अधिवेशन पाणथळ क्षेत्रे आणि त्यांच्या संसाधनांचे संवर्धन व सूज्ञ वापरासाठी एक चौकट प्रदान करते. रामसर अधिवेशनाचे ध्येय म्हणजे जगभरात शाश्वत विकास साधण्याच्या दिशेने योगदान म्हणून, स्थानिक आणि राष्ट्रीय कृती तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि सूज्ञ वापर करणे, हे आहे. दरवर्षी २ फेब्रुवारी  हा जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो.

रामसर करारः

  • रामसर करारावर  १९७१ साली इराणमधल्या रामसर येथे  स्वाक्षरी करण्यात आली .
  • भारताने  १९८२मध्ये या कराराला मान्यता दिली आणि शाश्वत वापरासाठी सक्रियपणे रामसर स्थळे निश्चित करते.
  • हा करार पाणथळ जागा आणि त्यांच्या संसाधनांच्या संवर्धनासाठी व शाश्वत वापरासाठी एक चौकट प्रदान करते  .
  • पाणथळ जागेने यासाठी असलेल्या ९ निकषांपैकी किमान एक निकष पूर्ण केला पाहिजे, जसे की २०,०००पेक्षा जास्त पाणपक्ष्यांना आधार देणे किंवा जैवविविधतेचे संवर्धन करणे.

भारतातल्या याआधीच्या रामसर स्थळांची यादीः

रामसर स्थळराज्य/केंद्रशासित प्रदेशवर्षक्षेत्र (चौ.किमी)
१कोल्लेरू तलावआंध्र प्रदेश (1)२००२९०१
२दीपोर बीलआसाम (1)२००२४०
३कंवर (कबर) तालबिहार (6)२०२०२६
४गोगबील तलाव२०२५०.८६
५उदयपूर झील२०२५३.१
६गोकुळ जलशाय२०२५४.४
७नागी पक्षी अभयारण्य२०२३              २
८नक्ती पक्षी अभयारण्य२०२३३.३
९नंदा तलावगोवा (1)२०२२०.४२
१०खिजाडिया डब्ल्यूएलएसगुजरात (5)२०२१६
११नालसरोवर बीएस२०१२१२३
१२थोल तलाव२०२१७
१३वधवना पाणथळ जागा२०२११०
१४छारी-धंद२०२६२२७
१५भिंडावास वन्यजीव अभयारण्यहरियाणा (2)२०२१४
१६सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान२०२११.४
१७चंदरताल पाणथळहिमाचल प्रदेश (3)२००५०.५
१८पाँग डॅम तलाव२००२१५७
१९रेणुका पाणथळ जागा२००५०.२
२०होकेरा पाणथळ जागाजम्मू आणि काश्मीर (5)२००५१४
२१हायगम वेटलँड सीएनआर२०२२८
२२शालबग पाणथळ जागा सीएनआर२०२२१७
२३सुरिंसर-मानसर तलाव२००५४
२४वुलर सरोवर१९९०१८९
२५अघानशिनी खाडीकर्नाटक (4)२०२४४८
२६अंकसमुद्र पक्षी सीएनआर२०२४१
२७मगडी केरे सीएनआर२०२४०.५
२८रंगनाथिट्टू बीएस२०२२५
२९अष्टमुडी पाणथळ जागाकेरळ (3)२००२६१
३०सास्थमकोट्टा तलाव२००२४
३१वेंबनाड कोल (भारतातील सर्वात लांब सरोवर)२००२१५१३
३२त्सो कार पाणथळ संकुललडाख (2)२०२०९६
३३त्सोमोरीरी तलाव२००२१२०
३४भोज पाणथळ जागामध्य प्रदेश (5)२००२३२
३५सख्या सागर२०२२२.५
३६सिरपूर पाणथळ जागा२०२२१.६
३७तवा जलाशय२०२४२००.५
३८यशवंत सागर२०२२८
३९लोणार तलावमहाराष्ट्र (3)२०२०४
४०नंदूर मधमेश्वर२०१९१४
४१ठाणे क्रीक२०२२६५
४२लोकटक तलावमणिपूर (1)१९९०२६६
४३पाला पाणथळमिझोराम (1)२०२११९
४४अनुसुपा तलावओडिशा (6)२०२२२
४५भितरकनिका खारफुटी२००२६५०
४६चिल्का सरोवर१९८१११६५
४७हिराकुड जलाशय२०२२६५४
४८सातकोसिया दरी२०२१९८२
४९तामरा तलाव२०२२३
५०बीस सीएनआरपंजाब (6)२०१९६४
५१हरिके तलाव१९९०४१
५२कांजली तलाव२००२२
५३केशोपूर-मियानी सीएमआर२०१९३.४
५४नांगल वन्यजीव अभयारण्य२०१९१
५५रोपर तलाव२००२१४
५६केओलादेव घाना एनपीराजस्थान (5)१९८१२९
५७सांबर तलाव१९९०२४०
५८सिलिसेरह तलाव२०२५३.१६
५९मेनार पाणथळ संकुल२०२५४.६
६०खिचन पाणथळ जागा२०२५०.५४
६१चित्रंगुडी बीएसतामिळनाडू (20)२०२२२.६
६२मन्नारच्या आखातातील सागरी बीआर२०२२५२७
६३कांजीरनकुलम बीएस२०२२१
६४करैवेट्टी बीएस२०२४४.५
६५कारिकिली बीएस२०२२०.६
६६कुंथनकुलम बीएस२०२१०.७
६७लॉन्गवुड शोला आरएफ२०२४१.२
६८पल्लिकरणाई मार्श आरएफ२०२२१२
६९पिचावरम खारफुटी२०२२१४.८
७०पॉइंट कॅलिमेअर डब्ल्यूएलएस आणि बीएस२००२३८५
७१सुचिंद्रम थेरूर पाणथळ संकुल२०२२०.९
७२उदयमार्थंडपुरम बीएस२०२२०.४
७३वडुवुर बीएस२०२२१.१
७४वेदान्तंगल बीएस२०२२०.४
७५वेलोड बीएस२०२२०.८
७६सक्कराकोट्टाई पक्षी अभयारण्य२०२४२.३
७७थेरथांगल पक्षी अभयारण्य२०२४०.३
७८काझुवेली पक्षी अभयारण्य२०२४५१.५
७९नंजरायन पक्षी अभयारण्य२०२४१.२
८०वेंबन्नूर पाणथळ संकुल२०२२०.२
८१रुद्रसागर तलावत्रिपुरा (1)२००५२.४
८२बखिरा डब्ल्यूएलएसउत्तर प्रदेश (11)२०२१२९
८३हैदरपूर पाणथळ जागा२०२१६९
८४नवाबगंज बीएस२०१९२.३
८५पार्वती आग्रा बीएस२०१९७
८६समन बीएस२०१९५.३
८७समसपूर बीएस२०१९८
८८संडी बीएस२०१९३.१
८९सरसाई नवार झील२०१९१.६
९०सुर सरोवर२०२०४.३
९१वरची गंगा नदी२००५२६६
९२पाटणा पक्षी अभयारण्य२०२६१.०९
९३आसन सीएनआरउत्तराखंड (1)२०२०४.४
९४पूर्व कोलकाता पाणथळ जागापश्चिम बंगाल (2)२००२१२५
९५सुंदरबन पाणथळ जागा (सर्वात मोठे RS)२०१९४२३०
९६कोपरा जलाशयछत्तीसगड (1)२०२५२.१
९७खेचेओपालरी पाणथळ जागासिक्कीम (1)२०२४१.७
९८उधवा तलाव पक्षी अभयारण्यझारखंड (1)२०२४९.३

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content