Homeन्यूज ॲट अ ग्लांसकॅनडाच्या 'कॉन्स्टेलेशन'कडून पुण्यातल्या...

कॅनडाच्या ‘कॉन्स्टेलेशन’कडून पुण्यातल्या ‘पिओसिट’चे अधिग्रहण

सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकित ‘कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर’ (सीएसआय) या कंपनीने भारतातील ‘पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक बळकट होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी पकड असलेल्या कंपनीने पुण्यातील एका महत्त्वाच्या सॉफ्टवेअर कंपनीला आपल्या समूहात सामील करून घेतल्याने या व्यवहाराकडे तंत्रज्ञान जगतात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

‘पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स’ ही भारतीय कंपनी प्रामुख्याने सहकारी बँकिंग आणि वित्त क्षेत्रांसाठी उपयुक्त आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली तयार करण्याचे काम करते. आपल्या दर्जेदार सेवा आणि ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या तंत्रज्ञानामुळे या कंपनीने बाजारपेठेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर’चा भाग झाल्यामुळे पिओसिट कंपनीला जागतिक पातळीवरील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)सारखे अद्ययावत तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची व्याप्ती आणि मोठ्या समूहाच्या अनुभवाचा थेट फायदा मिळणार आहे. या पाठबळामुळे कंपनीला आपल्या सेवांचा विस्तार अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होईल.

१६० देशातील १,००० कंपन्यांचे अधिग्रहण

१९९५पासून, ‘कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर’ संबंधित उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचे (क्रिटिकल) सोल्युशन्स देणाऱ्या व्हर्टिकल मार्केट सॉफ्टवेअर (व्हीएमएस) कंपन्यांचे अधिग्रहण करणे, त्यांची उभारणी करणे आणि त्यांना जोपासणे या तत्त्वावर काम करत आहे. ३०हून अधिक वर्षांच्या वाटचालीनंतर, ‘सीएसआय’ने १६०हून अधिक देशांमधील १२५हून अधिक व्हर्टिकल्समधील १,०००हून अधिक कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. सीएसआय ही टोरंटो स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेली कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांचा महसूल ११.६ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता आणि जगातील टॉप १० सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक म्हणून ती नावारूपास आली आहे.

सहकारी पतसंस्थांना मिळणार जागतिक दर्जाचे ‘एआय एनेबल्ड’ सॉफ्टवेअर

‘पिओसिट’चे संस्थापक संचालक दीपक सुराणा, अभिजित नांगरे आणि श्रीकांत मुळे यांनी यावर भर दिला की, ‘कॉन्स्टेलेशन कुटुंबात सामील होणे, हा पिओसिट आणि आम्ही उभारलेल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रत्येक भागधारकासाठी प्रचंड मूल्य (व्हॅल्यू) निर्माण करू. सॉफ्टवेअर कंपन्यांना जोपासण्याचा ‘कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर’चा जागतिक अनुभव ‘पिओसिट’ला एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मदत करेल. भारतातील सहकारी पतसंस्थांना आता जागतिक दर्जाचे ‘एआय एनेबल्ड’ सॉफ्टवेअर आणि सेवा मिळतील. पिओसिट एक स्वतंत्र कंपनी म्हणून राहील आणि आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम सॉफ्टवेअर आणि सेवा देण्यासाठी आमची बांधिलकी कायम राहील. पूर्वीप्रमाणेच संस्थापक ‘टीम पिओसिट’चे नेतृत्त्व करत राहील.’

Continue reading

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. वेंकट गिते यांची नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती ज‍िष्णु देव वर्मा यांनी आज, बुधवारी डॉ. गिते यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच...

E20मुळे गाड्या खराब होतात हा हेतूपुरस्सर चाललेला अपप्रचार!

अब्जावधी रुपयांचे परकीय चलन खर्चून आयात होणारे जीवाश्म इंधन आणि देशातच शेतकऱ्यांच्या घामातून तयार होणारे जैविक इंधन, या दोहोंमधील संघर्षात शेतकरी हिताचे मारेकरी नेमके कोण, असा थेट सवाल महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास...

ॲड. मितांशु पुरंदरे मुंबई भाजपच्या लीगल सेलचे सरचिटणीस

मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मितांशु पुरंदरे यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लीगल सेलचे सरचिटणीस म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एका शानदार कार्यक्रमात ॲड. मितांशु पुरंदरे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले. ॲड. अमितकुमार...
Skip to content