Homeएनसर्कलभोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना...

भोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना मिळाला न्याय!

कंपनी व मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या समझोत्यामुळे संबधित कामगारांचे हक्क संपुष्टात येत नाहीत, असा निकाल देत औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी भोर ईंण्डस्ट्रीजने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, कामगारांच्यावतीने उदयोन्मुख वकील मितांशु पुरंदरे यांनी काम पाहिले तर भोर कंपनीच्यावतीने वकील ए के गुप्ते यांनी बाजू मांडली.

२००४ साली पुण्यातील हजारो कामगारांना रोजगार देणारी प्रसिद्ध भोर ईण्डस्ट्रीज अचानक बंद झाली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात वाद झाला. कामगारांनी न्यायालयीन लढाईची सुरूवात केली. यावेळी राजकीय हस्तक्षेपाने कामगार संघटनां व व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य झाले. तथापि यावर नाखूश असणाऱ्या काही कामगारांनी कंपनीने कामगारांना दिलेला मोबदला नाकारला. त्यानंतर २२ वर्षं १४ कामगारांना सगळे दरवाजे ठोकूनही न्याय मिळत नव्हता. अखेर त्यांनी तीन वर्षांपूर्वी औद्योगिक कामगार न्यायालयात सदस्य डी एम पाटील यांच्यासमोर युएलपी क्रमांक ६९/२०२३ प्रमाणे पुर्नरिक्षण अर्ज दाखल केला. त्यावर तीन वर्षं सुनावणी घेत उपरोक्त निकाल देताना पाटील यांनी कामगार न्यायालयाने कामगारांच्या नुकसानभरपाईबाबतचा दिलेला आदेश रद्दबातल ठरवत कामगारांच्या बाजूने अशंत: निकाल दिला.

यावेळी औद्योगिक न्यायालयाने त्यांची निरीक्षणे नोंदविताना कंपनीने उद्योग कायमस्वरूपी बंद केला असला तरी कामगारकपात करणे कायदेशीर नव्हते. कंपनीने MRTU & PULP Act, 1971 अंतर्गत अन्यायकारक कामगारपद्धती अवलंबल्याचे यावेळी न्यायालयाने जाहीर करत कंपनीने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे निर्देशही दिले आहेत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content