Homeएनसर्कलप्रा. तु. शं....

प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे निधन

मराठवाड्यातील मागील पिढीतील साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे आज दुपारी नांदेड येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात आला.

तु. शं. हे दीर्घकाळ औरंगाबाद येथे सरस्वती भुवन कला – वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक / विभागप्रमुख होते. त्यांनी कथा, काव्य आणि समीक्षा लिहिली. प्रा. प्रकाश मेदककर यांनी त्यांच्या निवडक साहित्याचे संकलन – संपादन केले आहे. साहित्य अकादमीसाठी आधुनिक मराठी कवितांचा एक प्रातिनिधिक संग्रह प्रा. कुळकर्णी यांनी संपादित केला आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेशी आणि परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाशी ते अनेक वर्षे निगडीत होते. परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मसापने त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव केला होता. नरहर कुरुंदकर यांचे ते निकटचे स्नेही होते.

अनेकांनी प्रा. तु. शं. कुळकर्णी यांना औरंगाबादेत समर्थनगर ते सरस्वती भुवन परिसर आणि समर्थनगर ते साहित्य परिषद या रस्त्यावर पायी चालताना अनेकदा पाहिले आहे. ज्येष्ठ पत्रकार संजीव आणि राजीव कुळकर्णी यांचे ते वडील होत. 

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content