Homeहेल्थ इज वेल्थबोटाच्या हलक्याशा हालचालीने...

बोटाच्या हलक्याशा हालचालीने झाले उपचार व चालायला लागला रुग्ण!

बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्पाइन सर्जरीमुळे त्यांना नवजीवन मिळालं असून, आज ते स्वतःच्या पायावर चालत आहेत. वरवडे कामावरून घरी परतत असताना झालेल्या अपघातात त्यांच्या मानेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले. या दुखापतीमुळे पाठीच्या कण्यावर प्रचंड दबाव आला आणि त्यांच्या खांद्याखालचा संपूर्ण भाग निकामी झाला. स्थानिक पातळीवर अनेक रुग्णालयांनी ही दुखापत अत्यंत गंभीर असल्याचे सांगत उपचार करण्यास नकार दिला. पुढील १५ दिवस ते कोणत्याही ठोस उपचारांशिवाय घरीच होते, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला.

या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलशी संपर्क साधला. तेथे कन्सल्टंट स्पाइन सर्जन डॉ. मनिष कोठारी यांनी व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे तपासणी केली. या तपासणीत शरीर पूर्णतः निष्क्रिय असतानाही डाव्या पायाच्या अंगठ्यात झालेली अतिशय सूक्ष्म हालचाल त्यांनी ओळखली. हीच एक आशेची किरण ठरली. यानंतर वरवडे यांना तातडीने मुंबईत दाखल करण्यात आले. उपचारांमधील विलंबामुळे शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. रुग्णाला आयुष्यभर व्हेंटिलेटरवर राहवे लागू शकते, अशी शक्यता होती. तरीही, कुटुंबियांनी धाडसाने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. कोठारी आणि त्यांच्या टीमने सर्व्हायकल स्पाइन सर्जरी करून पाठीच्या कण्यावरील दबाव कमी केला आणि मणक्याला स्थिरता दिली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यात सकारात्मक बदल दिसू लागले. अवघ्या दोन आठवड्यांत वरवडे आधाराने चालू लागले आणि तीन महिन्यांत ते पूर्णपणे स्वतः चालण्यास सक्षम झाले.

डॉ. मनिष कोठारी म्हणाले की, “या केसमध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी रुग्ण व्हेंटिलेटरवर अवलंबून राहण्याची शक्यता होती. मात्र, आम्ही त्यांना स्वतंत्रपणे श्वास घेता यावा आणि सामान्य आयुष्य जगता यावे, यावर लक्ष केंद्रित केले.” जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके यांनी सांगितले की, “बीडसारख्या भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची गरज असते. अशावेळी टर्शियरी केअर सेंटर्सनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे असते. ही केस आमच्या बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.”

स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना राजीव वरवडे म्हणाले की, “अपघातानंतर सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं. पण जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले आणि आज मी पुन्हा चालू शकतोय. हे माझ्यासाठी नवजीवनच आहे.”

ही केस केवळ एका रुग्णाच्या पुनर्जन्माची कहाणी नसून, बीडसारख्या जिल्ह्यातील रुग्णांनी योग्यवेळी तज्ज्ञउपचार मिळविल्यास अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही आशा निर्माण होऊ शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. 

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content