Homeन्यूज अँड व्ह्यूजप्रभूजी.. तर मग...

प्रभूजी.. तर मग तुम्ही दिवाळखोरीत!

शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांच्या निवडणूक शपथपत्राचा हवाला देत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत त्यांना विचारले की, सुनील प्रभूजी तुमच्या संपत्तीच्या तुलनेत पंचवीस टक्के इतकी तुमची देणी दिसताहेत. तर मग तुम्ही लवकरच दिवाळखोर होणार का… नादारी जाहीर करणार का… मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या प्रश्नावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

दिवाळखोर

अर्थसंकल्पावरील चर्चा गेले दोन दिवस चालली आणि त्यात ७४ आमदारांनी भाग घेतला. या चर्चेला मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी उत्तर दिले. चर्चेत सहभाग घेतलेल्या सर्व ७४ सदस्यांची नावे घेत फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर दिलं. प्रभू यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना राज्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा इतका वाढला आहे की आता राज्य दिवाळखोरीत जाईल, असे वक्तव्य केले होते.

दिवाळखोर

त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, मी प्रभू यांच्या निवडणूक शपथपत्रावर नजर टाकली तर त्यात प्रभू यांची संपत्ती १४ कोटीची असल्याचे मला लक्षात आले. विविध प्रकारची देणी लक्षात घेतली तर प्रभू यांना सुमारे साडेतीन कोटी रुपयांची देणी आहेत, हेही लक्षात आले. म्हणजे प्रभू यांना संपत्तीच्या २५ टक्के देणी आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल जवळपास अशीच स्थिती आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. राज्यावरील कर्जाचे नुसते आकडे बघण्यापेक्षा कर्जाचे जीडीपीशी असलेले प्रमाण महत्त्वाचे असते. डेट टू जीडीपी हे प्रमाण केंद्राच्या निकषांनुसार कमाल २५ टक्केपर्यंत असायला मुभा आहे आणि राज्याचे हे प्रमाण १८ टक्क्यांच्या मर्यादेत आहे. त्यामुळे राज्याची स्थिती प्रभू सांगतात तितकी वाईट नाही. प्रभूजी, तुमचे कर्ज २५ टक्के आहे आणि राज्याचे केवळ १८ टक्के! मग राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करत असेल असे तुम्ही सांगत असाल तर तुम्हीही लवकरच दिवाळखोर होणार का…

दिवाळखोर

फडणवीस यांनी आपला मुद्दा पटवून देताना प्रभूजी तुम्ही दिवाळखोर होणार नाही, हे मला माहित आहे. कारण आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, असे म्हणताच सभागृहात पुन्हा हंशा पिकला.

(लेखक शैलेंद्र परांजपे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content