Homeन्यूज ॲट अ ग्लांसबंगालमध्ये राजकीय 'ग्रँड...

बंगालमध्ये राजकीय ‘ग्रँड स्लॅम’! लिएंडर पेसला भाजपमध्ये ‘स्पेस’!!

भारताचा दिग्गज टेनिसपटू आणि ‘कोलकाता बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिएंडर पेस याने मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राजकीय खळबळ उडवली. बंगाली माध्यमांच्या मते, २०२१मध्ये गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश करणाऱ्या पेसने आता ‘घासफूल’ सोडून ‘कमळ’ हाती घेतल्याने बंगालच्या राजकारणात मोठे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे.

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेसचा भाजप प्रवेश हा ममता बॅनर्जींसाठी वैयक्तिक धक्का मानला जात आहे. पेस केवळ जागतिक कीर्तीचा खेळाडू नसून कोलकातामधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. त्याचे वडील डॉ. वेस पेस हेदेखील बंगालच्या क्रीडा क्षेत्रातील मोठे नाव आहेत. त्यामुळे शहरी आणि उच्चभ्रू मतदारांमध्ये पेसचा प्रभाव भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो.

तृणमूल काँग्रेसमध्ये पेसला अपेक्षित सक्रिय भूमिका मिळत नसल्याने तो नाराज होता. भाजप आता त्याला बंगालमधील एखाद्या महत्त्वाच्या शहरी मतदारसंघातून उमेदवारी देण्याची किंवा पक्षाचा मुख्य प्रचारक म्हणून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. पेसने आपल्या भाषणात “विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे” सांगत पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content