Homeकल्चर +हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या ‘लिअरने जगावं की मरावं?’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. गोदरेज ॲण्ड बॉयज श्रमिक संघ, मुंबई या संस्थेच्या ‘मेला तो शेवटचा होता’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई- 1 केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक- योगेश कदम (नाटक- लिअरने जगावं की मरावं?), द्वितीय पारितोषिक- अभिमान अजित (नाटक- पाकीट)

प्रकाशयोजनाः प्रथम पारितोषिक- श्याम चव्हाण (नाटक- लिअरने जगावं की मरावं?), द्वितीय पारितोषिक- संजय तोडणकर (नाटक- ती रात्र)

नेपथ्य: प्रथम पारितोषिक- रोहन रहाटे (नाटक-पाकीट), द्वितीय पारितोषिक- विलास गायकवाड (नाटक- द इंटरव्ह्यू)

रंगभूषा: प्रथम पारितोषिक- अनिल कासकर (नाटक- झेंडा रोविला), द्वितीय पारितोषिक- प्रशांत खंदारे (नाटक- मेला तो शेवटचा होता)

उत्कृष्ट अभिनयः रौप्यपदक- सुनिल मळेकर (नाटक- पाकीट) व अक्षता सामंत (नाटक- ती रात्र)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रेः कविता जाधव (नाटक- मेला तो शेवटचा होता), श्रध्दा जोशी (नाटक- घात), स्वप्नाली पवार (नाटक- अशब्द), गुलाब लाड (नाटक- ना ते आपुले), योगेश कदम (नाटक- लिअरने जगावं की मरावं?), साहील कांबळे (नाटक- मेला तो शेवटचा होता), महेंद्र दिवेकर (नाटक- झेंडा रोविला), वैभव पिसाट (नाटक- अरे अरे बाबा)

24 नोव्हेंबर 2024 ते 05 डिसेंबर 2024 या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 18 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सतिश पेंडसे, राम चव्हाण आणि प्राची गडकरी यांनी तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिकप्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिकप्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content