Homeडेली पल्सआता महावितरणची नवीन वीजजोडणी...

आता महावितरणची नवीन वीजजोडणी होणार तत्काळ उपलब्ध!

कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून  देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे.  त्यामुळे वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणीसाठीनवीन सेवा जोडणी (NSC) योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी, असे सक्त निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना  देण्यात आले आहे.

कृषिपंप वगळून नवीन वीजजोडण्या देण्यासाठी नवीन सेवा जोडणी (New Service Connection – NSC), नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (Non DDF Consumer Contribution & Refund – CC&RF) तसेच समर्पित वितरण सुविधा (Dedicated Distribution Facility – DDF) अशा तीन योजना अस्तित्वात आहेत. यामध्ये वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजना अतिशय महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत नवीन वीजजोडणी देणे किंवा  वीज भार कमी अधिक करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची व यंत्रणेची कामेमहावितरणकडून करण्यात येतील. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. तर केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल.

मात्र राज्यात काही ठिकाणी नवीन सेवा जोडणीच्या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे  प्रकार समोर आले आहेत. त्याची महावितरणने गंभीर दखल घेत नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेचा ग्राहकांना सर्वप्रथम पर्याय देण्यात यावा असे सक्त निर्देश देण्यात आले आहे. तसेच या पायाभूत वीजयंत्रणेची कामे करण्यासाठी निधीची  कोणतीही कमतरता नाही. क्षेत्रीय कार्यालयांनी वीजखांब, वितरण रोहीत्र, स्विच गिअर्स, वीजवाहिन्यांसह आवश्यक साधनसामग्री आपापल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध ठेवावी तसेच ग्राहकांना तात्काळ नवीन  वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत. या योजनेमध्ये वीज भार वाढवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची कामे सुद्धा अंतर्भूत करण्यात आली आहेत.

वीज

यासोबतच नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (CC&RF) योजनेमध्ये अर्जदार ग्राहक स्वतःच्या  खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे व देखरेखीखाली  आवश्यक पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचे काम करतात. या खर्चाचा परतावा संबंधित वैयक्तिक  अर्जदाराला किंवा ग्राहकांच्या गटाला मासिक वीजबिलांमध्ये समायोजित केला जातो.

नवीन वीजजोडणीच्या तिसऱ्या समर्पित वितरण सुविधा (DDF) योजनेमध्ये प्रामुख्याने बांधकाम  व्यावसायिकांनी किंवा अर्जदार ग्राहकांनी स्वतःच्या खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदारांद्वारे स्वतंत्र  वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, उपकेंद्र, क्षमतावाढ आदी पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम केल्यास यावीजयंत्रणेची सुविधा संबंधित ग्राहकांसाठी समर्पित राहते. मात्र ही वीजयंत्रणा महावितरणकडे हस्तांतरित केली जाते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महावितरणकडे कायम राहते. 

सद्यस्थितीत या तिन्ही योजनांद्वारे महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची अंमलबजावणी सुरू आहे.मात्र राज्यात काही ठिकाणी महावितरण अधिकाऱ्यांकडून फक्त समर्पित वितरण सुविधा (DDF)  योजनेचा पर्याय देण्यात येत असल्याचे निर्दशनास आले आहे. महावितरणाच्या धोरणानुसार यापुढे नवीन वीजजोडण्यांचे अर्ज तसेच भार वाढवणे/कमी करण्याचे अर्ज नवीन सेवा जोडणी (NSC) किंवा नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (CC&RF) योजनेमध्ये स्वीकारले जातील. या दोन्ही योजनांऐवजी  समर्पित वितरण सुविधा (DDF) योजनेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांकडून तसा लेखी अर्ज घेऊनच  त्यामध्ये कामे करण्याचे निर्देश महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content