Homeडेली पल्सकेंद्राकडून 60 रू....

केंद्राकडून 60 रू. किलोने ‘भारत डाळ’!

ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने 17.07.2023 रोजी 1 किलो पॅकसाठी प्रति किलो 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो या अत्यंत अनुदानित दराने 17.07.2023 रोजी भारत डाळ ब्रँड अंतर्गत किरकोळ पॅकमध्ये चणा डाळ विक्री सुरू केली. नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि सफलच्या किरकोळ विक्री केंद्रातून भारत डाळीचे वितरण केले जात आहे. या व्यवस्थेअंतर्गत चणा डाळ राज्य सरकारांना त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलीस, तुरुंग, तसेच राज्य सरकार नियंत्रित सहकारी संस्था आणि महामंडळांच्या किरकोळ दुकानांमधून वितरणासाठी उपलब्ध करून दिली जाते.

ग्राहकांना किफायतशीर किमतीत डाळ उपलब्ध करून देण्यासाठी, सरकार किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत चणा, तूर, उडीद, मूग आणि मसूर या पाच प्रमुख डाळींचा राखीव साठा ठेवते. किमती नियंत्रित करण्यासाठी राखीव साठा टप्प्याटप्प्याने आणि निश्चित स्वरूपात बाजारात उतरवला जातो. ग्राहकांना तूर डाळीचे वितरण अतिरिक्त किंमत स्थिरीकरण निधीतून तुरीचे वितरण निश्चित आणि टप्प्याटप्प्याने करण्यासाठी साठ्याची उपलब्धता वाढवणे सुरू आहे. किंमत समर्थन योजना (PSS) आणि पीएसएफ राखीव साठ्यातील चणा आणि मूग यांचे साठे बाजारात सातत्याने वाजवी किमतीत आणले जातात. बाजारात आणण्याव्यतिरिक्त, राखीव साठ्यातून डाळींचा पुरवठा राज्यांना त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी आणि लष्कर आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांनादेखील केला जातो.

देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि डाळींच्या किमती कमी करण्यासाठी, तूर आणि उडदाची आयात 31.03.2024 पर्यंत ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत ठेवण्यात आली आहे आणि 31.03.2024 पर्यंत मसूरवरील आयात शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे. सुरळीत आणि अव्याहत आयात सुलभ करण्यासाठी तूरी वरील 10% आयात शुल्क काढून टाकण्यात आले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी, 2 जून 2023 रोजी अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत तूर आणि उडदावर 31 ऑक्टोबर 223 पर्यंतच्या कालावधीसाठी साठवण मर्यादा लागू करण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या ऑनलाइन साठवण देखरेख पोर्टलद्वारे डीलर्स, आयातदार, मिलधारक आणि व्यापारी यासारख्या संस्थांकडे असलेल्या डाळींचे सतत निरीक्षण केले जाते.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

कॅनडाच्या ‘कॉन्स्टेलेशन’कडून पुण्यातल्या ‘पिओसिट’चे अधिग्रहण

सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकित 'कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर' (सीएसआय) या कंपनीने भारतातील 'पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक...

भोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना मिळाला न्याय!

कंपनी व मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या समझोत्यामुळे संबधित कामगारांचे हक्क संपुष्टात येत नाहीत, असा निकाल देत औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी भोर ईंण्डस्ट्रीजने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, कामगारांच्यावतीने उदयोन्मुख वकील...

प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..

“प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..” हा डायलॉग आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर ओळख मानली जाते. अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रेम चोपडा यांनी खलनायकाच्या भूमिका करतानादेखील आपल्या वेगळ्या शैलीने चाहत्यांचे प्रेम मिळवले. पण काळाच्या ओघात...
Skip to content