Homeटॉप स्टोरीराज्यात आज कुठेही...

राज्यात आज कुठेही पावसाचा रेड अलर्ट नाही!

मंत्रालयातल्या राज्य आपत्ती नियंत्रण केंद्राने आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिलेला नाही. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जर २४ तासात २०४ मिमी पाऊस पडण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो. जर २४ तासात ११५ ते २०४ मिमी पाऊस पडण्याची शक्यता असली तर ऑरेंज अलर्ट देण्यात येतो.

येलो अलर्ट हा २४ तासांत ६५ ते ११५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता असल्यास देण्यात येतो. आज पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सातारा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना सध्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ग्रीन अलर्ट हा, ६५ मिमी पाऊस पडणार असेल तर देण्यात येतो. वरील सर्व जिल्हे वगळून उरलेल्या जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे.

या धारणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाची एकूण क्षमता ७४०.१७  दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत ३२४.३२ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची एकूण क्षमता २५५ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत ५२८ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ३०४.१० दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत २३.७० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाची एकूण क्षमता २०२.४४ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी धरणाची एकूण क्षमता ११२.१४ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत ५५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची एकूण क्षमता २१९.९७ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत १६१ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची एकूण क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत ९३ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला धरणाची एकूण क्षमता १८३.९४ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणाची एकूण क्षमता १६९.६७ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत १९.५० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा धरणाची एकूण क्षमता २१६.८७ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत १७.२५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाची एकूण क्षमता ७७९.३४ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत १६९ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना व नजीकच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत.

विजांच्या थैमानाच्या माहितीकरीता डाऊनलोड करा ‘दामिनी एप

किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी भरतीच्या लाटा दुपारी १२:३४ वाजता ४.८४ मीटर उंचीपर्यंत राहू शकतात. विजांचा कडकडाट ज्या भागात असतो अशा वज्राघातप्रवण जिल्ह्यांतील नागरिकांनी अद्ययावत राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “दामिनी: लाइटनिंग अलर्ट ॲप” डाउनलोड व इन्स्टॉल करावे. या ॲपच्या वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटरच्या परिसरातील विजेसाठी जीपीएस नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयच्या खबरदारीचे उपायदेखील सामायिक करते.

नागरिकांनी आपत्तींच्या चेतावणी आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET ॲप” डाउनलोड व इन्स्टॉल करावे. राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टलच्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे. आपत्तीसंबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL 

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content