Homeकल्चर +येत्या शनिवार/रविवारी पायात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अंदमानच्या सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि इतर सर्वच क्रांतिकारकांना बैलाच्या जागी कोलूला जुंपले जात असे आणि आठ तासांत तीस पाऊंड म्हणजे साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेलाचे प्रमाण पूर्ण न झाल्यास न थांबता कोलू फिरवावा लागे आणि अमानुष शिक्षाही केल्या जात. या अघोरी छळाला कंटाळून इंदुभूषण राय यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आत्महत्त्या केल्या. उल्हासकर दत्त यांच्यासारख्या अनेक वीरांचे मानसिक संतुलन ढळले. ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल’ हेच आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं. पण असंख्य क्रांतिकारकांच्या अपार त्याग आणि बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्याचं हे मोल, क्रांतिकारकांच्या यातना जाणून घेण्याची संधी मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने उपलब्ध केली आहे. भारतमातेच्या सुपुत्रांनी भोगलेल्या असह्य यातनांचा अनुभव राष्ट्रप्रेमी स्वतः कोलू चालवून घेऊ शकतात. यानिमित्ताने भारतातल्या युवा पिढीला खरा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल.

बंदीवानांना ८-८ तास कोलू फिरवावा लागत असला, तरी त्याचा थोडासा अनुभव म्हणून उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना अधिकाधिक १५ मिनिटे कोलू फिरवण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या यातनांचा थोडातरी अनुभव घेता यावा, यासाठी पायात बेड्या घालूनच हा कोलू फिरवायचा आहे. दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शनिवार, ४ आणि रविवार ५ एप्रिल २०२६ या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा अनोखा उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गूगल फॉर्म भरून वेळेची निश्चिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीविषयी कोणतीही शंका असल्यास ९२२००७०३८६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पायात बेड्या घालायच्या असल्याने फूलपँट / सलवार घालून यावे, जेणेकरून पायाला इजा होणार नाही. गूगल फॉर्मची लिंक- https://forms.gle/SVexjX6RbcNCTJFz6 कोलू फिरवण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्याच दिवशी देण्यात येणार आहे. स्मृती म्हणून कोलू फिरवून निघालेले तेलही उपक्रमानंतर २ दिवसांनंतर सर्वांना देण्यात येईल. स्वातंत्र्याचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content