Homeमुंबई स्पेशलविलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सदर प्रकल्पाबाबत अधिक माहिती करून घ्यायची असल्यास, मुंबई विमानतळ T1 मेट्रो स्थानकासमोरील या प्रकल्पास येत्या रविवारी, 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता जरूर यावे, असे आवाहन आमदार पराग अळवणी व नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी केले आहे.

एरवी उड्डाणपुला खालील जागांवर अतिक्रमण होत असते किंवा जुन्या गाड्यांचे डम्पिंग होत असते. त्यामुळे विलेपार्ले पूर्व येथील विमानतळाबाहेरील पश्चिम द्रूतगती मार्गावरील उड्डाणपुलाखालील जागेचा सदुपयोग व्हावा या हेतूने विलेपार्ले कल्चरल सेंटरतर्फे शहरी शेती प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या के-दक्षिण विभागाकडून मान्य करवून घेतला, अशी माहिती पराग अळवणी यांनी दिली. या प्रकल्पात प्रत्यक्ष शास्त्रीय पद्धतीने वाफे तयार करण्यात आले असून त्यावर विविध फळभाज्या लावण्यात येणार आहेत. तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या प्रेरणेने शहरी शेती अभ्यासवर्ग चालवण्यात येणार असून यामध्ये अनुभवी व प्रशिक्षित मान्यवर प्रत्यक्ष शेतकामाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचसोबत, वनस्पती वैविध्य दालन (plant diversity gallery) आणि वनस्पती सांभाळ केंद्र (plant care center)सुद्धा चालवण्यात येणार आहे. फुलपाखरू उद्यान, पक्षांना आकर्षित कसे करावे, माळीकाम कसे करावे इत्यादी विषयात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत, असे विलेपार्ले कल्चरल सेंटरचे समन्वयक राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content