Homeकल्चर +निर्मात्यांनी कलाकारांसाठी मध्यस्थांना...

निर्मात्यांनी कलाकारांसाठी मध्यस्थांना दूर ठेवावे!

‘सिंटा’च्या (CINTAA) अध्यक्षा आणि प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लाँ यांनी नुकतीच निर्मात्यांना थेट सिंटाच्या माध्यमातून कलाकारांची कास्टिंग करण्याची आणि कलाकारांना वेळेवर मेहनताना देण्याचे अपील केले आहे. विशेषतः अध्यक्षा पूनम ढिल्लाँ यांनी निर्मात्यांना विनंती करताना म्हटले की, निर्मात्यांनी त्यांच्या गरजा थेट सिंटाकडे पाठवाव्यात, जेणेकरून मध्यस्थ (दलाल) कलाकारांचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. सिंटा कोणत्याही लाभांशिवाय निर्मात्यांना योग्य कलाकार उपलब्ध करून देईल.

पूनम ढिल्लाँ यांनी पुढे आपले मत व्यक्त करताना सांगितले की, कलाकारांसाठीची ९० दिवसांची पेमेंट सिस्टीम (भुगतान प्रणाली) ही चुकीची आणि अन्यायकारक आहे. तसेच त्यांनी लहान व सह-कलाकारांनाही वेळेवर वेतन देण्याची मागणीही केली आहे. ढिल्लाँ यांच्या या वक्तव्यामुळे कास्टिंगचे नियम आणि पेमेंटच्या सुधारांविषयी कलाकारांमध्ये एका नव्या उत्साहाची आणि नवीन उपक्रमाची सुरुवात होण्याचे मोठे संकेत मिळत आहेत.

Continue reading

अभिनेता ऐश्वर्य ठाकरेची दमदार सुरूवात!

अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याने निशानची, या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी बेस्ट डेब्यू मेल (ज्युरी चॉइस) हा सन्मान मिळवत हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे. हा पुरस्कार ऐश्वर्य ठाकरे यांच्या अभिनय...
Skip to content