Homeचिट चॅटसेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. संघाचे प्रशिक्षक विशाल अशोक वाघेला यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत जिल्हा अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. संघाची कर्णधार शर्वरी डेरे हिने या विजयात मोलाची भूमिका बजावली. स्पर्धेदरम्यान संघाने केलेल्या एकूण पाच गोलांपैकी तब्बल तीन गोल शर्वरीने नोंदवत आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाविनोद, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, आयुक्त प्रियांका राजपूत, उपायुक्त स्वप्निल सावंत तसेच सहाय्यक आयुक्त (क्रीडा) दिपाली पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, मीरा-भाईंदर शहराच्या क्रीडा क्षेत्राचाही गौरव वाढला आहे. आगामी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही संघ अशीच उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content