Homeटॉप स्टोरीस्वातंत्र्यदिनानिमित्त 954 पोलिसांना...

स्वातंत्र्यदिनानिमित्त 954 पोलिसांना पदके जाहीर, त्यात महाराष्ट्रातले 76!

वर्ष 2023च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक सीआरपीएफचे जवान लौक्राक्पम इबोमचा सिंह यांना जाहीर झाले असून पोलीस शौर्य पदक 229 जणांना जाहीर करण्यात आले आहे. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक 82 जणांना तर गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी पोलीस पदक 642 जणांना जाहीर झाले आहे.

सर्वाधिक 230 शौर्य पुरस्कारांमधील 125 पदके डाव्या अतिरेकी विचारसरणीच्या प्रभावित  क्षेत्रात तैनात पोलिसांना, 71 जम्मू व काश्मीर क्षेत्रातील आणि 11 पदके ईशान्य क्षेत्रातील पोलीसकर्मींना जाहीर झाली आहेत. शौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या पोलिसांमध्ये सीआरपीएफचे 28, महाराष्ट्रातील 33, जम्मू-काश्मीरचे 55, छत्तीसगडचे 24, तेलंगणाचे 22 आणि आंध्र प्रदेशातील 18 पोलीस असून बाकीचे इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफचे आहेत.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि पोलीस शौर्य पदक, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण किंवा गुन्हेगारीला पायबंद किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते.

पोलीस शौर्य पदकांमध्ये महाराष्ट्रातल्या रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे. राज्यातल्या 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यातल्या 40 पोलिसांना जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये गोव्यातील पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांचा समावेश आहे.

पुरस्कार विजेत्यांचे तपशील खालीलप्रमाणे:

Click here to view List-I (राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक)

Click here to view List -II (पोलीस शौर्य पदक) 

Click here to view List -III (विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक)

Click here to view List -IV (गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक) 

Click here to view List-V (पदकप्राप्त पोलिसांची राज्य/दलानुसार सूची

तपशील www.mha.gov.in आणि  https://awards.gov.in वर उपलब्ध आहे. 

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content