Homeकल्चर +सेंसॉर बोर्डातून विद्या...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी टिकू तसेच जीविथा राजसेखर यांना आणि चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांना डच्चू देण्यात आला आहे. त्याचबरोबर या मंडळावर अभिनय क्षेत्रातल्या प्रीती झिंटा, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठी यांची वर्णी लागली आहे.

चित्रपट अधिनियमांतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारने ही पुनर्रचना केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे काल मंडळाच्या या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पुनर्रचित केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळातले आताचे 18 सदस्य पुढीलप्रमाणे-

अ. क्र.सदस्याचे नाव
1विनोद अनुपम
2मनोज जोशी
3अभिषेक जैन
4रिकी केज
5प्रियदर्शन
6सुनील शेट्टी
7हंसराज हंस
8सुप्रिया यारलागड्डा
9यतींद्र मिश्रा
10रुपाली गांगुली
11प्रीती झिंटा
12नील माधव पंडा
13पंकज त्रिपाठी
14प्रसन्नजित चॅटर्जी
15पल्लवी जोशी
16निशिगंधा वाड
17वामन केंद्रे
18रमेश पतंगे

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content