Homeटॉप स्टोरीलोकेश चंद्र महावितरणचे...

लोकेश चंद्र महावितरणचे प्रमुख तर संजीव जायस्वाल म्हाडाचे उपाध्यक्ष!

राज्य सरकारने आज २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस वी आर श्रीनिवास यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांची महावितरणच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जायस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांची नगरविकास विभागात प्रधान सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

राधिका रस्तोगी यांची नियोजन विभागात प्रधान सचिव आणि विकास आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली असून आय ए कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुंदन सध्या महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिव होत्या. महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्ट महाव्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व्हिलेज अँड इंडस्ट्रीज बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांची ओबीसी बहुजन विकास विभागात सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विभागाचे सचिव अनुप कृष्ण यादव यांची महिला आणि बाल विकास विभागात सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागात सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकचे महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त म्हणून पुण्यात नेमणूक करण्यात आली आहे. उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त डॉ. माणिक गुरसाल यांची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी (मेडा) येथे महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सहसचिव प्रदीप कुमार डांगे यांची नागपूरमध्ये रेशमी किडे संवर्धन विभागात संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नागपूरमधले मनरेगाचे आयुक्त शांतनु गोयल यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दीनदयाळ अंत्योदय योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची पशुसंवर्धन आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content