Homeब्लॅक अँड व्हाईटभारतीय नौदलाच्या 'त्रिपुट'चे...

भारतीय नौदलाच्या ‘त्रिपुट’चे जलावतरण

भारतीय नौदलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) तयार करत असलेल्या दोन प्रगत युद्धनौकांपैकी त्रिपुट, या पहिल्या युद्धनौकेचे गोव्यात नुकतेच जलावतरण करण्यात आले. सागरी परंपरेनुसार, अथर्ववेदाच्या मंत्रोच्चारात गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत रीता श्रीधरन यांच्या हस्ते जहाजाचे जलावतरण झाले. भारतीय नौदलाच्या अदम्य भावनेचे तसेच दूरवर आणि खोलवर मारा करण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शक्तिशाली बाणावरून या जहाजाचे नाव त्रिपुट ठेवण्यात आले आहे.

25 जानेवारी 19 रोजी संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात त्रिपुट श्रेणीतील  दोन प्रगत युद्धनौका तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. शत्रूच्या क्षेत्रातील  जहाजे, पाणबुड्या आणि विमानांविरुद्ध लढाऊ कारवाईच्या दृष्टीने या जहाजांची रचना करण्यात आली आहे.

त्रिपुट श्रेणीची जहाजे 124.8 मीटर लांब आणि 15.2 मीटर रुंद आहेत. त्याची पाण्याखालील खोली 4.5 मीटर आहे. त्याचे वजन  अंदाजे  3600 टन आहे आणि गती कमाल 28 सागरी मैल आहे. ही जहाजे स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालींनी सुसज्ज आहेत.

जीएसएलमध्ये जहाजबांधणी झालेल्या त्रिपुट श्रेणीतील जहाजे रशियाकडून विकत घेतलेल्या तेग आणि तलवार श्रेणीच्या जहाजांप्रमाणे आहेत. भारतीय शिपयार्डद्वारे प्रथमच स्वदेशात या युद्धनौका बनवल्या जात आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत, शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्ससह बहुतांश उपकरणे आणि सुटे भाग स्वदेशी आहेत. यामुळे भारतीय उत्पादन कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन, देशात रोजगारनिर्मिती आणि क्षमतावाढ सुनिश्चित होईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content