Homeपब्लिक फिगररश्मी शुक्ला भाजपाच्या...

रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट?

ज्या रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा हवाला देऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बदल्यांच्या रॅकेटचा आरोप करत हेत, त्या रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करताना कोणाचीही परवानगी घेतली नाही. बेकायदेशीरपणे त्यांनी सर्व फोन टॅप केले. महाविकास आघाडीचे सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत सर्व प्रमुख नेत्यांचेही फोन त्यांनी टॅप केले होते. त्या भारतीय जनता पार्टीच्या एजंट म्हणून काम करत होत्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

फडणवीस ज्या रिपोर्टचा संदर्भ देत होते. त्यामध्ये ८० टक्के पोलिसांची बदली झालेली नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. त्याआधी ते निर्णय जस्टीफाय करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे येतात. तो निर्णय करत असताना एसीएस होम, तेव्हाचे डीजी सुबोध जैस्वाल या समितीमध्ये असताना त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. खालच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांची शिफारस पोलीस इस्टाब्लीशमेंट बोर्डच्या अध्यक्षांनी पाठवली आहेत, असेही ते म्हणाले.

आमदार फोडता येत नाहीत म्हणून आता अधिकार्‍यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा आणि देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत. गृहमंत्र्यांच्या हालचालीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतात. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची हालचालीचे पोलिस रेकॉर्ड सादर केले. ते सादर करत असताना ही हालचाल होती की नाही हे मला माहित नाही, असे सांगून भ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारला बदनाम करुन केंद्राचा वापर करत हे सरकार बदलता येते का हा प्रयत्न भाजपा करत आहे. परंतु आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. कुठलेही सरकार बहुमतात आहे तोपर्यंत सत्तेपासून कुणी दूर करू शकत नाही. सर्वोच्च न्यायावयाचा बोम्मई प्रकरणात तसा निर्णय आहे. जोपर्यंत सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत कुठलेही सरकार सत्तेपासून दूर करता येत नाही. ते अधिकार राज्यपाल किंवा केंद्र सरकारला  नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनेचा माझ्यावर दबाव होता. त्याचवेळी त्यांनी खुलासा केला होता की, मी याच्याबाबतीत ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला होता असे फडणवीस म्हणाले पण गृह विभागात ॲडव्होकेट जनरलला कुठलाही सल्ला मागवण्याचा एकही कागद नाही असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी केला.

मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर जो विषय घडला तो अतिशय गंभीर आहे. एक खालचा पोलीस अधिकारी कुणाची गाडी घेऊन त्याच्यात बॉम्ब ठेवतो. त्याची कारणे काय? बॉम्ब कुणाच्या बोलण्यावरून ठेवण्यात आला याचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. कुठलेही सरकार सुरुवातीला अधिकार्‍याची पाठराखण करते. पण सत्य समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करायला आड येत नाही. सर्व परिस्थिती व माहिती मिळाल्यानंतर सचिन वाझे यांची पाठराखण करण्याचे काम सरकारने केले नाही. सचिन वाझे यांना अटक होण्याअगोदर परमवीर सिंह त्यांच्या कार्यालयात तीन तास वाझेबरोबर बंद दाराआड चर्चा करत होते, याचा अर्थ काय, असा सवालही त्यांनी केला.

मोहन डेलकर यांची आत्महत्त्या मुंबईमध्ये झाल्यानंतर गुन्हा मुंबईत दाखल होणार की दादरा-नगरहवेलीमध्ये होणार, याचे उत्तर परमबीर सिंह यांनी जनतेला द्यावे, असेही ते म्हणाले.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content