Homeपब्लिक फिगरलसीकरणातला गोंधळ आदित्य...

लसीकरणातला गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशिर्वादाने?

मुंबई महापालिकेकडून चालू असलेल्या लसीकरणात प्रचंड गोंधळ चालू असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने हे गैरप्रकार चालू आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

१८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद झाले असताना कोरोना योद्धे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील बड्या मंडळींचे, अभिनेत्यांचे व अभिनेत्यांशी संबंधित व्यक्तींचे बिनबोभाट लसीकरण चालू आहे. लसीकरणातील गैरप्रकार न थांबल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईकरांना तातडीने भरपाई द्या

नुकत्याच झालेल्या वादळामुळे मुंबईतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून महापालिका व राज्य सरकारने संबंधितांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईत वादळाने अनेक ठिकाणी झोपड्यांचे पत्रे उडून गेले आहेत. वादळाने, पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी. या पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तास लागले. यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत हे सिद्ध झाले, असेही ते म्हणाले.

छोट्या, मोठ्या रस्त्यांवर झाडे मोठ्या प्रमाणावर पडली. वर्दळीच्या मोठ्या रस्त्यांवरील झाडे महापालिकेकडून हटविली गेली. मात्र छोट्या रस्त्यांवर पडलेली, सोसायट्यांच्या भिंतींवर पडलेली झाडे अजून हटविली गेली नाहीत. झाडे पडून २ मृत्यू झाले आहेत. याला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला.

महापालिकेच्या झाडे कापणीच्या कंत्राटाची मुदत मार्चमध्येच संपली आहे. हे कंत्राट महापालिकेत ज्यांनी अडवून ठेवले त्यांची चौकशी करा व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.  

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content