Homeएनसर्कलइराणच्या गुप्तचर प्रमुखाचा...

इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू! तात्पुरत्या युद्धविरामाला नकार!!

इराणच्या सुरक्षायंत्रणेला सोमवारी मोठा हादरा बसला आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) गुप्तचर प्रमुख मजीद खादेमी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, यामुळे इराणच्या लष्करी नेतृत्त्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खादेमी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी, युद्धाच्या या धामधुमीत हे इराणसाठी मोठे धोरणात्मक नुकसान मानले जात आहे. दुसरीकडे, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराणने आपला पवित्रा अधिकच आक्रमक केला आहे. जर प्रस्तावित शस्त्रसंधी केवळ तात्पुरत्या स्वरूपाची आणि नावापुरती असेल, तर ही महत्त्वाची सागरी व्यापारी वाट कोणत्याही परिस्थितीत खुली केली जाणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. केवळ कायमस्वरूपी तोडगा आणि ठोस आश्वासने मिळाल्यावरच नाकेबंदी मागे घेतली जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे.

एकीकडे सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू आणि दुसरीकडे जागतिक तेलपुरवठ्याची नाडी असलेल्या हॉर्मुझवर कायम ठेवलेला ताबा, यामुळे पश्चिम आशियातील पेच अधिक वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टीमेटमनंतरही इराण दबावापुढे झुकण्यास तयार नसल्याचे यातून स्पष्ट होत असून, आगामी काही तास जागतिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरतील.

ट्रम्प यांची नवी ‘डेडलाईन’, तर पाकिस्तानकडून युद्धविरामाचा प्रस्ताव

पश्चिम आशियातील युद्ध गेल्या एक महिन्यापासून धगधगत असतानाच, सोमवारी अत्यंत वेगाने हालचाली झाल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला निर्वाणीचा इशारा आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू असलेली युद्धविरामाची चर्चा यामुळे हे युद्ध आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. १ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर “मंगळवार, रात्री ८:०० (ईस्टर्न टाइम)!” अशी एक गूढ पोस्ट केली आहे. इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ खुली न केल्यास मंगळवारपासून इराणमधील वीजप्रकल्प आणि पुलांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. “ते देश पुन्हा उभा राहायला २० वर्षे लागतील,” अशा कठोर शब्दांत त्यांनी धमकावले आहे.

पाकिस्तानची मध्यस्थी: ‘इस्लामाबाद करारा’ची शक्यता

दुसरीकडे, इराण आणि अमेरिका यांच्यातील शत्रुत्व संपवण्यासाठी पाकिस्तानने एक शांतता आराखडा तयार केला असल्याची माहिती समोर येत आहे. उभय देशांना शत्रुत्व संपवण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, पाकिस्तानच्या माध्यमातून आजच युद्धविरामावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वॅन्स आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या सतत संपर्कात आहेत.

अर्धा अब्ज डॉलर्सची बचाव मोहीम आणि ‘ते’ गूढ रेडिओ संदेश

इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकेच्या एफ-१५ फायटर जेटच्या वैमानिकाला वाचवण्यासाठी राबवण्यात आलेली मोहीम जगातील सर्वात महागडी आणि धाडसी मोहीम ठरली आहे.

  • मोठा खर्च: या मोहिमेत एक एफ-१५ई, दोन सी-१३० हरक्युलिस आणि एक एमक्यू-९ रीपर ड्रोन गमावल्यामुळे अमेरिकेला सुमारे ५० कोटी डॉलर्स (अर्धा अब्ज डॉलर्स)पेक्षा जास्त फटका बसला आहे.
  • फसगत टाळली: बचाव मोहिमेदरम्यान बेपत्ता अमेरिकन वैमानिकाकडून आलेला रेडिओ संदेश ‘मुस्लिम’ ढंगाचा वाटल्याने, तो इराणने रचलेला सापळा असावा अशी भीती अमेरिकन पथकाला वाटली होती. यामुळे ही मोहीम थोडक्यात धोक्यात आली होती, मात्र योग्यवेळी ओळख पटल्याने वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
  • इराणचा दावा: इराणच्या लष्कराने असा दावा केला आहे की, अमेरिकेने या बचाव मोहिमेसाठी दक्षिण इसफाहनमधील एका बेवारस विमानतळाचा वापर केला होता.

इराणचे जशास तसे उत्तर: “चाव्या हरवल्या आहेत!”

ट्रम्प यांच्या हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याच्या मागणीला इराणने उपरोधिक उत्तर दिले आहे. “आम्ही सामुद्रधुनीच्या चाव्या हरवल्या आहेत,” अशा शब्दांत इराणच्या राजनैतिक मिशनने ट्रम्प यांच्या अल्टिमेटमची थट्टा केली आहे. “हॉर्मुझची स्थिती आता कायमची बदलली असून ती जुन्या स्थितीत कधीच परतणार नाही,” असा इशारा इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने दिला आहे.

भारताची भूमिका: जयशंकर यांची कतार आणि यूएईशी चर्चा

पश्चिम आशियातील संकटाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होऊ नये, यासाठी भारत सक्रिय झाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवर सविस्तर चर्चा केली. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानच्या मध्यस्थीने होणाऱ्या संभाव्य युद्धविरामाकडे आणि ट्रम्प यांच्या उद्याच्या डेडलाईनकडे लागले आहे. जर आज तोडगा निघाला नाही, तर हे युद्ध अधिक भीषण रूप धारण करण्याची भीती व्यक्त होत आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content