Sunday, March 16, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसआयफोन आणि आयपॅड...

आयफोन आणि आयपॅड युझर्स सावधान!

प्रसिद्ध टेक कंपनी “ॲपल”ने अलीकडेच जगभरातील त्यांच्या अब्जावधी आयफोन आणि आयपॅड युझर्ससाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. Apple ने सर्व युझर्सना त्यांचे iPhones आणि iPads अपडेट करण्यास सांगितले आहे, अन्यथा धोकादायक सायबर गुन्हेगार त्यांच्या डिव्हाइसेसवर नियंत्रण मिळवू शकतात. गंभीर सुरक्षाभेद्यता आढळल्याने ॲपलने हा हाय ॲलर्ट जारी केला आहे. विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या ‘अत्यंत अत्याधुनिक’ सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी ॲपलने आता iOS 18.3.1 आणि iPadOS 18.3.1 असे आपत्कालीन सुरक्षा अपडेट जारी केले आहेत.

CVE-2025-24200 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भेद्यतेमध्ये प्रत्यक्षात एक समस्या निर्माण झाली आहे. सायबर हल्लेखोर लॉक केलेल्या डिव्हाइसवरील USB प्रतिबंधित मोड अक्षम करण्यास रिमोटली अनुमती देऊ शकतात. iOS 11.4.1 मध्ये सादर करण्यात आलेला USB प्रतिबंधित मोड हे एक सुरक्षावैशिष्ट्य आहे, जे USB कनेक्शनद्वारे लॉक केलेल्या डिव्हाइसवरील डेटावर अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी डिझाइन केलं आहे. या मोडला बायपास करून, हल्लेखोर आता संभाव्यतः डिव्हाइसमधून संवेदनशील व आर्थिक महत्त्वाचा डेटा काढून घेऊ शकतात.

अ‍ॅपलने अद्याप विस्तृत तपशीलांबद्दल खुलासा केलेला नाही. परंतु लक्ष्यित व्यक्तींवरील सायबर हल्ल्यांमध्ये या पद्धतीने घुसखोरी केली गेली आहे. आता आयफोन एक्सएस आणि नंतरच्या मॉडेल्स तसेच विविध आयपॅड मॉडेल्ससाठीदेखील अपडेटची शिफारस केली गेली आहे. टोरंटो विद्यापीठाच्या मंक स्कूलमधील द सिटीझन लॅबचे बिल मार्कझॅक यांनी या भेद्यतेची प्रथम तक्रार केली होती. आपत्कालीन अपडेट आता अ‍ॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांमधील त्रुटी दूर करते आणि सायबर हल्लेखोरांना युएसबी प्रतिबंधित मोड अक्षम करण्यापासून रोखते. या मोडमध्ये सामान्यतः आयफोन किंवा आयपॅडला युएसबीद्वारे संगणकाशी कनेक्ट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक असतो आणि अनधिकृत डेटा प्रवेश रोखला जातो.

Continue reading

‘निफ्टी’मध्ये 28 वर्षांनंतर ऐतिहासिक निरंतर घसरण!

भारतीय शेअर बाजार सध्या मंदीच्या तडाख्यात सापडलेला आहे. 1996नंतर तब्बल 28 वर्षांनंतर बाजार असा सलग घसरणीच्या चक्रव्यूहात फसलेला दिसत आहे. गेल्या 5 महिन्यांपासून शेअर बाजाराच्या निर्देशांक "निफ्टी"ने निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत. या 5 महिन्यांत 15% घसरण नोंदविली गेली आहे....

शेअर बाजारातली घसरण 30 वर्षांचा विक्रम मोडणार?

भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड दबावाखाली आहे. सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा सामना करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स 900 अंकांपेक्षा जास्त घसरला. निफ्टी 22,600च्या खाली आला तर आयटी निर्देशांक 2% घसरला. इंडिया VIX...

पुण्यात 4 महिन्यांत तयार झाला देशातला पहिला 3-D प्रिंटेड बंगला!

पुण्यात गोदरेज प्रॉपर्टीजसाठी भारतातील पहिला 3D-प्रिंटेड व्हिला बांधला गेला आहे. आयआयटी, मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या डीप-टेक स्टार्टअप ट्वास्टाने हा 3-डी प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. पुण्यातील गोदरेज ईडन इस्टेट्स येथे चार महिन्यांच्या कालावधीत हा जी+1 असा 2,200...
Skip to content