Homeएनसर्कलसप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.

किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास असेल. वाढत्या घटकखर्चाला न जुमानता ॲपल किंमती स्थिर ठेवण्यासाठी पुरवठादारांशी आक्रमक वाटाघाटी करत आहे, जे ग्राहकांसाठी दिलासादायक आहे.

डीएसएलआर कॅमेऱ्यांप्रमाणे मेकॅनिकल आयरिस

तंत्रज्ञानाच्या आघाडीवर हे आयफोन अनेक मोठ्या बदलांसह येणार आहे. ए 20 प्रो चिपसेट 2 एनएम प्रक्रियेवर बनवला जाणार असून ऊर्जाबचत आणि कार्यक्षमतेचे नवे मानक प्रस्थापित करेल. मुख्य कॅमेऱ्यात डीएसएलआर कॅमेऱ्यांप्रमाणे मेकॅनिकल आयरिस (व्हेरिएबल अपर्चर) असणार आहे, ज्यामुळे प्रकाशनियंत्रण अत्यंत प्रभावी होईल.

आयफोन इतिहासातील सर्वात जास्त क्षमतेची बॅटरी

48 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा एफ/1.4 ते एफ/2.8 अशा वेगवेगळ्या अपर्चरवर काम करेल आणि बॅटरी क्षमता तब्बल 5,200 एमएएचपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही आयफोन इतिहासातील सर्वात जास्त क्षमतेची बॅटरी असेल.

डिझाइनमध्ये आमूलाग्र बदल

डिझाइनमध्येही आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. ॲपल ‘अंडर-डिस्प्ले फेस आयडी’ तंत्रज्ञान आणण्याच्या विचारात आहे, ज्यामुळे डायनॅमिक आइसलँड पूर्णपणे नाहीसे होऊन स्क्रीन अधिक विस्तीर्ण आणि बिनखंडित दिसेल. बॅक पॅनेलवर सूक्ष्म पारदर्शक काचेचा फिनिश आणि ‘गडद लाल (ब्रुगेंडी)सारख्या नव्या रंगपर्यायांची चाचणी सुरू आहे.

फोल्डेबल आयफोन मॉडेल

प्रो मॅक्समध्ये 6.9 इंचाचा भव्य ओएलईडी प्रो मोशन डिस्प्ले असेल. याशिवाय, ॲपल या सप्टेंबर इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित आयफोन फोल्डदेखील सादर करणार असल्याच्या बातम्या आहेत, जे ॲपलच्या इतिहासातील पहिले फोल्डेबल आयफोन असेल. थोडक्यात, आयफोन 18 मालिका केवळ स्मार्टफोन नव्हे, तर तंत्रज्ञानाची एक नवी व्याख्याच ठरणार आहे.

Continue reading

आता टोलनाका ओलांडतानाच तपासला जाणार गाडीचा विमा

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर...

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत...

मतदारयादीत नाव नाही? अर्ज करा ३० नोव्हेंबरपर्यंत!

महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदारयादी पुनरिक्षण (एसआयआर)चे वेळापत्रक निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सुधारले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, आता महाराष्ट्राची अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरला नव्हे, तर मंगळवारी, २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार...
Skip to content