Homeटॉप स्टोरीआशियाई क्रीडा स्पर्धेसाठी...

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू करणार पारंपरिक पोशाख!

चीनमधील हांगझोऊ येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या आगामी 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या पथकासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) मंगळवारी (5 सप्टेंबर) अधिकृत पोशाख आणि क्रीडा साहित्याच्या किटचे अनावरण केले.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या निरोप समारंभाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आयओएच्या अध्यक्ष आणि महान धावपटू पीटी उषा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय पथकाचे प्रतिनिधी म्हणून भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर पीआर श्रीजेश (पुरुष), सविता पुनिया (महिला), नेमबाज मनू भाकेर आणि 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोळाफेकमधील सुवर्णपदक विजेता तजिंदरपाल सिंग तूर आणि अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडू उपस्थित  होते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची संकल्पना आणि अनोख्या पद्धतीने डिझाईन केलेल्या या औपचारिक पोशाखात महिलांसाठी खाकी पोत असलेली साडी आणि पुरुष खेळाडूंसाठी खाकी कुर्ताचा समावेश आहे.

यावेळी बोलताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, हा केवळ एक गणवेश नाही, आपल्या  खेळाडूंसाठी अभिमान आणि ओळख यांचे प्रतीक आहे. हा गणवेश अभिमानाने भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिनिधित्व करतो आणि देशाचा वैविध्यपूर्ण वारसा आणि डिझाइन नेतृत्व प्रदर्शित करतो. मला विश्वास आहे की संघ जेवढा तरुण आणि नव्या भारताचे प्रतिनिधित्व करेल, आपण ऐतिहासिक कामगिरी सुनिश्चित करू आणि सर्वोत्तम पदक संख्येसह परत येऊ. मी देशाला आवाहन करतो की त्यांनी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून त्यांचा उत्साह वाढवावा.

आयओएच्या अध्यक्ष डॉ. पीटी उषा म्हणाल्या की, या पथकातील प्रत्येक सदस्याने भारताला अभिमान वाटेल असे सर्वोत्कृष्ट प्रयत्न करावेत अशी आपली अपेक्षा आहे. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपण मोठी प्रतीक्षा केली आहे आणि भारत 634 खेळाडूंचे सर्वात मोठे पथक पाठवत आहे याचा आपल्याला आनंद आहे. आम्हाला विश्वास आहे की या खेळाडूंमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके पटकावण्याची क्षमता आहे, असे त्या म्हणाल्या.

आयओए मध्ये, आम्ही खेळाडूंना क्रीडा विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आणि त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाईल हे सुनिश्चित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

हांगझोऊ येथे जाणाऱ्या खेळाडूंमध्ये रोईंग क्रीडा प्रकारातील 33 सदस्यांचा सर्वात मोठा संघ पदकाच्या शर्यतीत आहे. दरम्यान, 15 सदस्यांचा ई स्पोर्ट्स चमू देखील आशियाई क्रीडा स्पर्धेत अधिकृत पदार्पण करणार आहे.

2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने 16 सुवर्णांसह 70 पदके पटकावली होती.

भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) ही प्रशासकीय संस्था असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, राष्ट्रकुल क्रीडा महासंघ, ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया आणि असोसिएशन ऑफ नॅशनल ऑलिम्पिक कमिटीची संलग्न सदस्य आहे. आयओएने क्रीडा विषयक शिक्षण आणि ऑलिम्पिक अभ्यासाच्या विकासासाठी विविध हितधारकांसह अनेक उपक्रम राबवले आहेत.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content