Homeबॅक पेजआयएनएस सुमेधा केनियात...

आयएनएस सुमेधा केनियात दाखल!

आफ्रिकेत केल्या जात असलेल्या लांब पल्ल्याच्या तैनातीचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाचे जहाज ‘सुमेधा’ केनियामधील पोर्ट लामू येथे नुकतेच दाखल झाले. केनियातील अलीकडे विकसित करण्यात आलेल्या बंदरावर भारतीय नौदलाच्या कोणत्याही जहाजाने दिलेली ही पहिलीच भेट आहे.

या बंदर भेटीदरम्यान, दोन्ही नौदलांचे कर्मचारी परस्पर सहकार्य वाढवण्याच्या आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने व्यावसायिक संवाद, डेक भेटी आणि क्रीडा स्पर्धा द्वारे देवाणघेवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. या भेटीचा भाग म्हणून एक संयुक्त योग सत्र, डेकवरील मेजवानी, वैद्यकीय शिबिर आणि सागरी भागीदारी व्यायामाचे नियोजनदेखील आयोजित करण्यात आले आहे.

आयएनएस सुमेधा, हे भारतीय नौदलाच्या स्वदेशात विकसित सरयू श्रेणीतील तिसरे जहाज आहे. 07 मार्च 2014 रोजी राष्ट्रार्पण झालेल्या या जहाजाला स्वतंत्रपणे आणि सामुहिक कार्यांच्या समर्थनार्थ विविध भूमिकांमध्ये तैनात करण्यात आले आहे. हे जहाज शस्त्रे आणि सेन्सर्सच्या रचनेने सुसज्ज आहे, तसेच हे जहाज अनेक भूमिका निभावणारे हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते. हे जहाज विशाखापट्टणम येथे स्थित भारतीय नौदलाच्या पूर्व फ्लीटचा एक भाग आहे आणि पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफच्या ऑपरेशनल कमांड अंतर्गत कार्य करते.

भारतीय नौदलाच्या ‘मैत्रीचे पूल’ बांधण्याच्या आणि मैत्रीपूर्ण देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाची जहाजे नियमितपणे परदेशात तैनात केली जातात. ही भेट क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास’ (SAGAR) या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे आणि भारत-आफ्रिकेतील संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करते.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content