Homeटॉप स्टोरीइन्कम टॅक्सचे पोर्टल...

इन्कम टॅक्सचे पोर्टल आठवडाभर बंद!

प्राप्तीकर विभाग (इन्कम टॅक्स) आपले नवीन ई-फाईलिंग पोर्टल www.incometax.gov.in, येत्या 7 जून 2021 रोजी सुरू करणार आहे. हे पोर्टल सुरू करण्याच्या तयारीसाठी आणि स्थलांतरणाच्या कामांसाठी प्राप्तीकर विभागाचे सध्याचे पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in करदात्यांसह अन्य बाह्य हितधारकांना 6 दिवसांच्या कालावधीसाठी म्हणजेच 1 जून, 2121 ते 6 जून 2021पर्यंत उपलब्ध नसेल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

प्राप्तीकर विभागाच्या नवीन ई-फाईलिंग पोर्टलचा उद्देश (www.incometax.gov.in) करदात्यांना सुविधा पुरवणे आणि आधुनिक गतिमान अनुभव प्रदान करणे हा आहे. या नव्या पोर्टलची वैशिष्ट्यं पुढीलप्रमाणे-

  • करदात्यांना त्वरित परतावा देण्यासाठी आयकर विवरणपत्राच्या (आयटीआर) त्वरित प्रक्रियेसह एकत्रित केलेले नवीन करदातास्नेही पोर्टल.
  • करदात्यांना पाठपुरावा करता यावा यासाठी सर्व परस्पर संवाद आणि अपलोड किंवा प्रलंबित कारवाई एकाच डॅशबोर्डवर प्रदर्शित केले जातील.
  • डेटा एन्ट्री प्रयत्न कमी करण्यासाठी, कोणतीही करविषयक माहिती नसल्यासदेखील, करदात्यांना आयटीआर भरण्यास मदत करण्यासाठी विनामूल्य आयटीआर तयार करण्याचे सॉफ्टवेअर इंटरॅक्टिव्ह प्रश्नांसह ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध.
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ट्युटोरिअल्स, व्हिडिओ आणि चॅटबॉट / लाइव्ह एजंटसह करदात्यांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे देण्यासाठी करदात्याला सहाय्य करण्यासाठी नवीन कॉल सेंटर.
  • डेस्कटॉपवरील सर्व प्रमुख पोर्टल कार्ये मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध असतील जी नंतर मोबाइल नेटवर्कवर कोणत्याही वेळी पाहता येतील.
  • कर सुलभपणे भरण्यासाठी कोणत्याही बँकेच्या करदात्याच्या खात्यातून नेटबँकिंग, यूपीआय, क्रेडिटकार्ड आणि आरटीजीएस / एनईएफटी वापरून बहुविध नवीन पेमेंट पर्यायांसह नवीन पोर्टलवरील नवीन ऑनलाईन करभरणा प्रणाली सक्षम केली जाईल.

हे पोर्टल सुरू करण्याच्या तयारीसाठी आणि स्थलांतरण कामांसाठी विद्यमान पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in 1 ते 6 जूनपर्यंत उपलब्ध नसेल. करदात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विभाग या कालावधीत कोणत्याही अनुपालन तारखा निश्चित करणार नाही. तसेच  करदात्यांना नवीन प्रणालीवर प्रतिसाद देण्याबाबत वेळ देण्यासाठी 10 जून, 2021पासून केवळ खटल्यांच्या सुनावणीच्या तारखा किंवा अनुपालन तारखा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर, या कालावधीत ऑनलाईन सबमिशन आवश्यक असणारी कोणतीही सुनावणी किंवा अनुपालन ठरवले असेल तर ते अगोदर घेतले जाईल किंवा पुढे ढकलले जाईल आणि या कालावधीनंतर कामाचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.

प्राप्तीकर विभागाने बँका, एमसीए, जीएसटीएन, डीपीआयआयटी, सीबीआयसी, जीईएम, डीजीएफटी यासारख्या बाह्य संस्थांना (ज्या पॅन पडताळणीची सेवा उपलब्ध करतात) या सेवा उपलब्ध नसल्याबद्दल कळवण्यात आले आहे आणि इतर ग्राहकांना/हितधारकांना अवगत करण्याबाबत व्यवस्था करायची विनंती केली आहे. त्यामुळे ब्लॅकआउट कालावधीच्या आधी किंवा नंतर कोणतीही संबंधित क्रिया पूर्ण केली जाऊ शकेल.

ब्लॅकआउट कालावधीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून करदात्यांना 1 जून 2021पूर्वी कोणतीही सबमिशन, अपलोड किंवा डाउनलोड यासह त्यांची सर्व तातडीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

या नवीन ई-फायलिंग पोर्टलच्या क्रियांन्वयनादरम्यान आणि त्यानंतरच्या प्रारंभिक कालावधीत नवीन प्रणालीशी परिचित होताना सर्व करदाते आणि इतर हितधारकांनी संयम बाळगावा अशी विनंती प्राप्तीकर विभागाने केली आहे. करदाता आणि इतर हितधारकांचे अनुपालन सुलभ करण्यासाठी सीबीडीटीचा हा आणखी एक उपक्रम आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content