Wednesday, November 6, 2024
Homeचिट चॅटचेंबूर जिमखाना बुद्धिबळः...

चेंबूर जिमखाना बुद्धिबळः अनिरुद्ध पोटावाड यंदाही विजेता

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याने क्रिस्टल कम्युनिटी हॉल, जेड १ आणि जेड २ हॉलमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत यंदादेखील गतविजेत्या अनिरुद्ध पोटावाडने चमकदार कामगिरी करताना विजेतेपद कायम राखले.

अनिरुद्धने या स्पर्धेत ९ पैकी ८.५ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. पारस भोईर आणि अर्णव कोळी यांचा अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक लागला. आयएम समीर खाटमाळे यांनी ९ पैकी ८ गुणांची कमाई केली. आयएम सौम्या स्वामीनाथनने या स्पर्धेत ९ पैकी ७ गुणांची कमाई केली.

स्पर्धेचे संयोजक आणि सीजी बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी खेळाडूंचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी चेंबूर जिमखान्याला स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व संबंधित बुद्धिबळ संघटनांचे आभार मानले. मध्य उपनगरातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ६०९ खेळाडूंचा सहभाग लाभला होता. या स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके होती. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content