Homeडेली पल्ससोन्याच्या तस्करीच्या मोठ्या...

सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा केला डीआरआयने पर्दाफाश!

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जमीन आणि रेल्वे मार्गांद्वारे परदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. 13 आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी वाराणसी, नागपूर आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या ठिकाणी डीआरआयच्या पथकाचा समावेश असलेल्या आणि अतिशय काळजीपूर्वक, नियोजित आणि सुव्यवस्थितपणे केल्या गेलेल्या या कारवाईत 31.7 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत सुमारे 19 कोटी रुपये आहे.

डीआरआय

देशाच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या टोळीचा शोध लावण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने काम करण्याची डीआरआयची सातत्यपूर्ण क्षमता या कारवाईद्वारे सिद्ध होते. संपूर्ण भारतातील अशा कारवाई मध्ये विविध तपास यंत्रणांचे आपसातील सहकार्यसुद्धा अधोरेखित झाले आहे.

विशिष्ट गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित कारवाई करून, नागपूर डीआरआयच्या पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना कोलकाताहून निघालेल्या रेल्वेमधून नागपूर रेल्वे स्थानकावर उतरताना पकडले. त्यांच्याकडून 8.5 किलो वजनाचे विदेशी चिन्हांकित सोने जप्त करण्यात आले. या तस्करांच्या चौकशीनंतर डीआरआयच्या पथकाने तस्करीच्या सोन्याच्या दोन खरेदीदारांची ओळख पटवून त्यांना सुद्धा ताब्यात घेतले.

वाराणसी येथील डीआरआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर 3 तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आणि जंगलातील शोध मोहिमेनंतर वाहनासह दोन आरोपी पकडण्यात यश मिळविले. त्या दोघांकडून आणि कारच्या हँडब्रेकच्या खाली बनवलेल्या पोकळीतून सुमारे 18.2 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

डीआरआय

आणखी एका कारवाईत वाराणसीहून रेल्वेने सोने घेऊन गेलेल्या पाच आरोपींना शोधण्यात मुंबईच्या पथकाला यश आले. या पथकाने त्यांच्याकडून 4.9 किलोग्रॅम सोने जप्त केले.

या आरोपींच्या चौकशीत असे उघड झाले की, ही टोळी बांगलादेशच्या सीमेवरून भारतात सोन्याची तस्करी करत असे आणि पुढे ते मुंबई, नागपूर, वाराणसी शहरांकडे ते सोने विक्रीसाठी पाठवले जायचे. योग्य परिश्रम आणि समन्वित कारवाईच्या योजनेसह, डीआरआयने मुंबईत पाच, वाराणसीत दोन आणि नागपुरमध्ये चार अशा एकूण 11 जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेले लोक सोन्याच्या तस्करी करणाऱ्या टोळीच्या सर्व स्तरावरील म्हणजे वाहक /प्रवासी, हँडलर आणि तस्करीच्या सोन्याचे अंतिम प्राप्तकर्ते अशा सर्व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content