Homeचिट चॅटआहुति साप्ताहिकाच्या बोरीवली...

आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे धूमधडाक्यात प्रकाशन

महाराष्ट्रातल्या अंबरनाथ येथून प्रसिद्ध होणाऱ्या आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे नुकतेच नाटककार जयवंत दळवी लघु नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली ‘प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा’ या सोहळ्यात रसिक श्रोते आणि वाचकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रकाशन करण्यात आले.

ओडिसी नृत्यगुरू शुभदा वराडकर, गिरगाव कट्टाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप मालणकर, बोरीवली आवृत्तीच्या सहसंपादिका रेवा देसाई, कला संपादिका भक्ती सावंत यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले. ११ जून १९६६ रोजी स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ पत्रकार वसंतराव त्रिवेदी यांनी अंबरनाथ येथून आहुति साप्ताहिक सुरू केले. प्रारंभी पाक्षिक असलेल्या आहुतिचे सहा महिन्यांत साप्ताहिकात परिवर्तन झाले. त्रिवेदी यांनी कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर, डहाणू, मनमाड अशा आवृत्त्या प्रकाशित केल्या. आता गिरीश त्रिवेदी यांच्या संपादकत्वाखाली बोरीवली आवृत्ती प्रकाशित करण्यात येत आहे. प्रदीप मालणकर, शिवचरित्राचे अभ्यासक राजू देसाई, मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब, कलामहर्षी उदय पै आणि बाळकृष्ण सावंत अशा असंख्य हितचिंतकांनी या आवृत्तीसाठी अनमोल सहकार्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

वसुली एजंट गावात दिसले की झोडपून काढा!

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात मायक्रोफायनान्स कंपनीकडून हत्त्या झाल्याचा आणि पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्याकडे सत्ताधाऱ्यांचा पैसा आहे....

स्वाती मोहिते यांना केशवसृष्टी पुरस्कार

प्रत्येक दिव्यांग मुलाला सहानुभूती नको, सन्मान द्या, त्यांच्यातल्या त्रुटी नाही तर क्षमता ओळखा आणि त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात घेऊन या, अशा शब्दांत सतराव्या केशवसृष्टी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या स्वाती मोहिते यांनी सल्ला दिला. सतरावा केशवसृष्टी पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी बोरिवली येथील...

५ टक्के महिलांच्या स्तनात आढळल्या लक्षणीय गाठी!

एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९००हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या...
Skip to content