Homeचिट चॅटगोविंद येतयेकर व...

गोविंद येतयेकर व ओम प्रकाश चौहान प्रदेश भाजपाचे माध्यम व सहमाध्यमप्रमुख

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशचे माध्यमप्रमुख म्हणून काल गोविंद येतयेकर यांची तर सहमाध्यममुख म्हणून ओम प्रकाश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत गोविंद येतयेकर व ओम प्रकाश चौहान यांना संघटनात्मक नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस सुनील राणी, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रदेश उपाध्यक्षपदी बढती झाल्यानंतर माध्यमप्रमुख नवनाथ बन यांना प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते बनवण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या माध्यमप्रमुखपदी येतयेकर आणि आणि त्याखालोखाल सहमाध्यमप्रमुखपदी चौहान यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content