Homeकल्चर +दादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रविवारी गायनसंध्या

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या रविवारी, १४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता संगीतमय गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुंबईतल्या ख्यातनाम गायिका देवश्री नवघरे यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर यति भागवत आणि संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे यांची साथ मिळणार आहे.

संगीतप्रेमींसाठी ही एक अविस्मरणीय मैफल ठरणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, १२२-ए, जे. के. सावंत मार्ग, मुंबई ग्लास वर्क्ससमोर, माहिम, मुंबई-४०००१६ येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: २४३०४१५० / ९८२०६७२२०१

Continue reading

दहावीतल्या निधी पावसकरचाही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, याचा आदर्श नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. दहावीत शिकणाऱ्या निधी पावसकर या मुलीने आपल्या पिगी बँकेत साठवलेली १०,००० रुपयांची पुंजी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी नुकतीच सुपूर्द केली. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी...

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत खालसा कॉलेज चमकले!

महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत माटुंगा येथील गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर...

पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या उपस्थितीने रंगला ‘आशाताई आणि मी’!

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील स्वररंग प्रतिष्ठान, या संस्थेने आयोजित केलेला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा 'आशाताई आणि मी' हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे संपन्न झाला. यावेळी नव्वदीच्या घरात पोहोचलेले पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने रसिकांच्या तुडूंब...
Skip to content