Homeडेली पल्समहिला श्रमशक्तीचा सहभाग...

महिला श्रमशक्तीचा सहभाग दर झाला 37 टक्के!

केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकताच (9 ऑक्टोबर 2023 रोजी) कामगार मनुष्यबळ सर्वेक्षण अहवाल 2022-23 जारी केला. यानुसार, कामगारांच्या सहभागाचे मोजमाप करण्याच्या ‘सामान्य स्थिती’ तत्त्वानुसार, देशातील महिला कामगारांच्या सहभागामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. हा दर 2023 मध्ये 37.0 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तो पूर्वी 4.2 टक्के होता.

महिला कामगार शक्तीच्या सहभाग दरातील ही लक्षणीय उसळी, महिलांच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक आणि राजकीय विकासाच्या उद्देशाने धोरणात्मक उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी सरकारने राबवलेल्या निर्णायक कार्यक्रमाचा, परिणाम आहे.

महिलांच्या दैनंदीन जीवनापर्यंत सरकारी उपक्रम पोहचले आहेत. मुलींचे शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता सुविधा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम यांचा यात समावेश आहे. या क्षेत्रातील धोरणे आणि कायदे सरकारचा ‘महिलाभिमुख विकास’ अजेंडा चालवित आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content