Homeएनसर्कलकृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती घडवून आणू शकतात, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले.

शहादा येथील नवीन बस स्टॅन्ड जवळील लोणखेडा रस्त्यावर सुरू असलेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात प्रयोगशील शेतकरी, फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच आदर्श ग्रामपंचायती यांचा गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. निर्मल सीडसचे संचालक डॉ. सुरेश पाटील, मेट्रोजन बायोटेकचे प्रियंक शाह व रुची शाह, नमो बायो प्लांटचे स्वराज पारख, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, एअरटेल बायोप्लांटचे पद्मसिंह निंबाळकर, कृषीदूत बायो हर्बलचे रामनाथ जगताप, आनंद ॲग्रो केअरचे घनश्याम हेमाडे व शोभा हेमाडे, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी काही शेतकरी, गट व ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आले.

जैवविविधतेने संपन्न असलेल्या या जिल्ह्यात मिलेट्स, एकात्मिक शेती, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, केळीबरोबरच कलिंगड, पपई, मिरची व भाजीपाल्यातही हा जिल्हा अव्वल आहे. कृषी उत्पादनाला आता प्रक्रियेची जोड दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ होईल. ॲग्रोवर्ल्डने पुढच्या वर्षी ही बाब लक्षात घेऊन कृषी निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाशी निगडित स्टॉल्स व चर्चासत्र आयोजित करावे, अशी अपेक्षादेखील गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी शेतीत सोलर वीज पंपाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. ॲग्रोवर्ल्डच्या प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मोफत पाणी परीक्षण, रोज 100 लकी ड्रॉ

नाशिक येथील आनंद ॲग्रो केअरतर्फे शेतकऱ्यांना प्रदर्शनात मोफत पाणी परीक्षण तसेच तत्काळ रिपोर्टची व्यवस्था करण्यात आली होती. पद्मावती सीड्सतर्फे लकी ड्रॉद्वारे रोज 100 जणांना ग्रो बँग गिफ्ट देण्यात आली. भर पावसातही मशागत करणाऱ्या हाय व्हील्ससह फवारणीसाठीचे ड्रोन प्रात्यक्षिक, सोलर फार्मिंग, झटका मशीन, सोलरवरील वॉटर पंपाचेही स्टॉल्स प्रदर्शनात होते. शेतमजुरीला पर्याय ठरतील, अशा पिकांच्या लागवडीपासून ते पिकांच्या काढणी, मळणीपर्यंतच्या अवस्थेतील विविध प्रकारचे लहानमोठे अत्याधुनिक 25हून अधिक कृषीयंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन या प्रदर्शनात होते. या प्रदर्शनात 150हून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले होते.

पुरस्कारप्राप्त शेतकरी, गट व ग्रामपंचायत

ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी- धर्मेंद्र पाटील (बोराळे, पोस्ट – कुकावल, ता. शहादा), मनोहर पाटील (रा. खलाणे, ता. शिंदखेडा), भरत पाटील (मु. पो. तिखोरे, ता. शहादा), नरेंद्र गिरासे (जावरा तर्फे बोरद, ता. शहादा), पुरुषोत्तम पाटील (मामाचे मोहिदे, ता. शहादा), सेगा राज्या पटले (कुंभरी, ता. धडगाव), योहान गावित (भवरे, ता. नवापूर), माधव माळी (दुधाळे, ता. जि. नंदुरबार.), राजाराम पाटील (कोळदा, ता. जि. नंदुरबार.), विश्वनाथ पाटील (कुडवाड, ता. शहादा).

ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी उद्योजक- मधुकर तुकाराम पाटील (ता. शहादा), जितेंद्र पाटील (शहादा).

ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट- बलराम शेतकरी गट (तळोदा), महात्मा फुले शेतकरी गट (वडफळी).

ॲग्रोवर्ल्ड आदर्श फार्मर प्रोड्युसर कंपनी- पातोंडा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (नंदुरबार), सरल कृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी (वावद).

ॲग्रोवर्ल्ड आदर्श वन व वन्य प्राणी संरक्षक- सागर निकुंभे शहादा.

ॲग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन- सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, पिपळखुटा.

ॲग्रोवर्ल्ड आदर्श ग्रामपंचायत- तळवे ता. तळोदा, मोरखी ता. अक्कलकुवा, कात्री ता. धडगाव, भुजगाव ता. धडगाव, बामखेडा ता. शहादा.

ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी विस्तारक- जितेंद्र सोनवणे (ता. जि. नंदुरबार), संदीप कुंवर

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content