Homeकल्चर +पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या...

पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिल्लीच्या राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात पिप्रहवा अवशेष आणि मौल्यवान रत्न-अवशेष यांचे ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे अवशेष अलीकडेच भारतात परत आणण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. यानिमित्ताने 127 वर्षांनंतर भारतात परत आणण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या पिप्रहवा येथील रत्न-अवशेषांचे, पिप्रहवा स्थळावरील 1898 तसेच 1971 ते 1975 या कालावधीत झालेल्या उत्खननांत प्राप्त झालेल्या अवशेष, रत्न-अवशेष आणि अवशेष-पेटिकांचे पुन्हा एकत्रिकरण होत आहे.

‘द लाइट अँड द लोटस : रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात, सांकृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखालील विविध सांस्कृतिक संस्थांकडील संबंधित पुरातन अवशेष व कलाकृती विषयानुरूप पद्धतीने सादर करण्यात आल्या आहेत. या अवशेषांमध्ये भगवान बुद्धांशी संबंधित आतापर्यंतचे सर्वात व्यापक संकलन आहे. खोल तत्त्वज्ञानात्मक अर्थ, उत्कृष्ट कारागिरी आणि जागतिक आध्यात्मिक महत्त्वाचे ते प्रतीक आहेत. या प्रदर्शनात इ.स.पू. सहाव्या शतकापासून आजपर्यंतच्या कालखंडातील शिल्पकला, हस्तलिखितं, थांग्का चित्रे तसेच विधीपर वस्तूंसह 80हून अधिक वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

जुलै 2025मध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्रालयाने अवशेषांचे यशस्वी पुनर्प्राप्तीकरण केल्याच्या स्मरणार्थ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रयत्नात हाँगकाँग येथील सोथबीज संस्थेमध्ये प्रस्तावित असलेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. 1898मधल्या उत्खननानंतर पहिल्यांदाच, या प्रदर्शनात पुढील घटक एकत्रितपणे सादर करण्यात येत आहेत.

• 1898मध्ये कपिलवस्तू येथील उत्खननातून प्राप्त झालेले अवशेष

• 1972मध्ये करण्यात आलेल्या उत्खननांतून मिळालेले मौल्यवान पुरातन अवशेष

• भारतीय संग्रहालय, कोलकाता येथील अवशेष-पेटिका आणि रत्नजडित मौल्यवान वस्तू

• अलीकडेच पेप्पे कुटुंबाच्या संग्रहातून भारतात परत आणलेले अवशेष (रत्न-अवशेष व अवशेष-पेटिका सापडल्या होत्या ती अखंड दगडी संदूक)

1898मध्ये विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांनी कपिलवस्तू येथील प्राचीन स्तूपात भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष शोधून काढले. या शोधानंतर या अवशेषांचे काही भाग जगभर वितरित करण्यात आले. त्यापैकी एक भाग सायामच्या (थायलंड) राजाला अर्पण करण्यात आला. दुसरा भाग इंग्लंडला नेण्यात आला, तर तिसरा भाग कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात जतन करण्यात आला. 2025मध्ये पेप्पे कुटुंबाकडे असलेला अवशेषांचा भाग भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे भारतात परत आणण्यात आला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content