Homeडेली पल्सअंबाजोगाईत बघा मराठवाडा...

अंबाजोगाईत बघा मराठवाडा मुक्तिसंग्रामातील दूर्मिळ छायाचित्रे!

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त, मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दूर्मिळ अशा छायाचित्रांचे प्रदर्शन, जिल्हा परिषद हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई येथे  आज, १७ व उद्या, १८ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले असून हे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत सर्वासाठी मोफत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय संचार ब्यूरो व राज्य शासनाचे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, तसहसील कार्यालय, पंचायत समिती व वृक्षमित्र अभियान अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

या प्रदर्शनात मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्वाच्या घटना-घडामोडी, दूर्मिळ अशा चित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यात १८५७ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात माडण्यात आली आहे.

या वेळी दोन दिवसांकरिता देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार असून भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा मुळ उद्देश हा विद्यार्थी आणि नविन पिढीला स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्या सेनानिंच्या अथक परिश्रमाची व बलिदानाची आठवण व्हावी हा आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन केज मतदार संघाच्या आमदार श्रीमती नमिता मुंदडा यांच्या हस्ते दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार असून यावेळी अपर जिल्हाधिकारी शरद झाडके, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, तहसिलदार विलास पाटील, गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे-काळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, गट शिक्षणाधिकारी व्ही. आर. शेख, गटशिक्षणाधिकारी (परळी) श्रीराम कनाके, तालूका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी अधिकारी पी. कुमार, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, विविध शाळांचे प्रतिनिधी व विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनास सर्वांनी भेटी द्याव्यात, असे आवाहन केंद्र सरकार व राज्य सरकाच्या यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content