Homeटॉप स्टोरीमराठा आरक्षणावर मंगळवारी...

मराठा आरक्षणावर मंगळवारी विधानसभेत चर्चा!

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी म्हणजेच १२ डिसेंबरला नागपूरला सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या समस्यांवरही सोमवारी, ११ डिसेंबरला चर्चा होईल.

मराठा

विधानसभेचे आजचे कामकाज संपण्यापूर्वी तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी अध्यक्षांच्या वतीने ही घोषणा केली. आज सकाळी विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे अनेक सदस्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरही तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी आपण अध्यक्षांशी तसेच संसदीय कार्य मंत्र्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन मी दिले होते. या दोघांशी चर्चा करून मी असे जाहीर करतो की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या विषयावर सोमवारी तर मराठा आरक्षणाच्या विषयावर मंगळवारी चर्चा घेण्यात येईल, असे कुणावार म्हणाले.

त्याआधी अशोक चव्हाण यांनी औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे मराठा आरक्षणाचा विषय उपस्थित केला होता. एका मंत्र्याने या विषयावर विधानसभेच्या सभागृहात चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन जाहीररीत्या दिले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सरकार या विषयावर चर्चा करण्यास तयार आहे आणि वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेने या विषयावरील चर्चेसाठी दिवसही निश्चित केला आहे. या सभागृहातील गटनेत्यांशी बोलून अध्यक्षांनी या चर्चेसाठी दिवस निश्चित करावा म्हणजे या विषयावर चर्चा करता येईल. सरकारचीही चर्चा व्हावी, ही भूमिका आहे. 

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content