Homeचिट चॅटऑस्ट्रेलियातल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिन्मय ढवळे,...

ऑस्ट्रेलियातल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिन्मय ढवळे, अजय कृष्णन जोडी विजेती 

ऑस्ट्रेलिया येथे क्वीन्स लँड बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच ‌आयोजित केलेल्या एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी‌ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे,अजय कृष्णन यांनी बाजी मारली.

या स्पर्धा ओपन ए, बी, सी व डी ग्रुपमध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे, मुंबई व अजय कृष्णन, केरळ यांनी “बी” ग्रुपमध्ये दुहेरीचे विजेतेपद मिळवले. या गटात‌ 14 जोड्यांनी भाग घेतला होता.  एक गेम 31 पॉईंटचा होता. स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यातून प्रथम चार जोड्यांनी उपांत्य फेरी गाठली.

चिन्मय व अजयने उपांत्य फेरीत पहिले मांनांकन देण्यात आलेल्या लुकान लान व दवे नऊंग जोडीचा सनसनाटी पराभव केला. त्यांनी अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या मानांकित सुमित पुरी, राजेश वर्गीस जोडीवर सहजरीत्या मात करून दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मय ढवळे मुंबईचा असून त्याला सुरुवातीच्या काळात आयकर विभागाचे माजी निरीक्षक व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मिलिंद पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभले होते. चिन्मयने गेल्या महिन्यातसुद्धा 35 वर्षांवरील दुहेरीच्या गटात जुड वर्णकुला यांच्या साथीने विजेतेपद मिळवले होते.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content