Homeकल्चर +छाया कदम प्रथमच...

छाया कदम प्रथमच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजत आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आता छाया कदम ‘स ला ते स ला ना ते’ या येत्या ७ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथालेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवादलेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कलादिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित

प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती केल्या आहेत. त्यांच्या मराठी-हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय चित्रपटांतून मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची शैली आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. ही फिल्म अ प्लाटून वन डिस्ट्रीब्युटर्सचे शिलादित्य बोरा रिलीज करत आहेत.

वृत्तवाहिनीचा रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांची अनोखी प्रेमकथा या चित्रपटात पाहयला मिळणार आहे. या प्रेमकहाणीत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येतात. त्यात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरते. या पोलिस अधिकाऱ्याला छाया कदम यांनी त्यांच्या शैलीत अतिशय उत्तमप्रकारे न्याय दिला आहे. प्रत्येक भूमिकेत आपल्या अभिनयाचं वेगळेपण त्यांनी अधोरेखित केलं आहे. त्यामुळे “स ला ते स ला ना ते” या चित्रपटात त्यांचा पोलिस अधिकारी किती भाव खातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Continue reading

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. वेंकट गिते यांची नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती ज‍िष्णु देव वर्मा यांनी आज, बुधवारी डॉ. गिते यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच...

E20मुळे गाड्या खराब होतात हा हेतूपुरस्सर चाललेला अपप्रचार!

अब्जावधी रुपयांचे परकीय चलन खर्चून आयात होणारे जीवाश्म इंधन आणि देशातच शेतकऱ्यांच्या घामातून तयार होणारे जैविक इंधन, या दोहोंमधील संघर्षात शेतकरी हिताचे मारेकरी नेमके कोण, असा थेट सवाल महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास...

ॲड. मितांशु पुरंदरे मुंबई भाजपच्या लीगल सेलचे सरचिटणीस

मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मितांशु पुरंदरे यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लीगल सेलचे सरचिटणीस म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एका शानदार कार्यक्रमात ॲड. मितांशु पुरंदरे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले. ॲड. अमितकुमार...
Skip to content