Homeहेल्थ इज वेल्थकोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात...

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथके!

कोरोना म्हणजेच कोविड-१९ रूग्णांची सर्वाधिक संख्या आणि मृत्त्यू असलेल्या महाराष्ट्रात त्याचप्रमाणे मृत्त्यूसंख्या जास्त असलेल्या पंजाब आणि छत्तीसगढमध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा समावेश असणारी केंद्रीय पथके पाठवावीत असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल देशातील कोविड-19 महामारीची स्थिती आणि लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात हे निर्देश देण्यात आले.

देशातील ५७ टक्के रूग्ण महाराष्ट्रात

गेल्या 14 दिवसात देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 57% रुग्ण महाराष्ट्रात आढळले. याच काळात 47% मृत्त्यू महाराष्ट्रात नोंदविण्यात आले. महाराष्ट्रात दैनंदिन आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 47,913 पर्यंत पोहोचली असून यापूर्वीच्या सर्वाधिक संख्येपेक्षा ती दुप्पट आहे.

गेल्या 14 दिवसात देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 4.5% रुग्ण पंजाबमधील आहेत. तथापि, एकूण मृत्त्यू संख्येपैकी 16.3% मृत्यू पंजाबमधील असून ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 14 दिवसात देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 4.3% रुग्ण छत्तीसगढमधील असून याच काळातील एकूण मृत्यूंपैकी 7% टक्के मृत्त्यू छत्तीसगढमधील आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी 91.4% रुग्ण आणि देशातील एकूण मृत्यूंपैकी 90.9% मृत्यू, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक

कोविड रुग्णवाढीचा आणि देशात कोविडमुळे झालेल्या मृत्त्यूचा चिंताजनक दर यासह 10 राज्यात आढळलेले 91%पेक्षा जास्त रुग्ण आणि कोविडमुळे झालेले मृत्यू सविस्तर करण्यात आलेल्या सादरीकरणात अधोरेखित करण्यात आले. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमधील परिस्थिती गंभीर व चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले.

प्रभावी अंमलबजावणीचा अभाव नडला

कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तनाच्या पालनात प्रामुख्याने मास्कचा वापर, 2 मीटरचे अंतर राखणे यात झालेली कमी, महामारीमुळे आलेला थकवा आणि क्षेत्रीय स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीचा अभाव हे रुग्णसंख्या तीव्रतेने वाढण्याचे कारण असण्यावर यावेळी भर देण्यात आला.

६ ते १४ एप्रिलमध्ये विशेष मोहीम

चाचणी, शोध, उपचार, कोविड प्रतिबंधासाठी कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने सुयोग्य वर्तनासाठी  विशेष मोहीम, 6 एप्रिल ते 14 एप्रिल 2021 या कालावधीत आयोजित केली असून या मोहीमेदरम्यान  मास्कचा 100% वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्थळे/कार्यालये या ठिकाणची स्वच्छता आणि आरोग्य सुविधांवर भर देण्यात येईल.

कोरोना

सुयोग्य वर्तनाची अंमलबजावणी करा

येत्या काळात, कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने सुयोग्य वर्तनाची अंमलबजावणी करण्याची गरज, खाटांची उपलब्धता, चाचणी सुविधा आणि वेळेत रुग्णालयात दाखल करणे इत्यादी  सुनिश्चित करणे. आरोग्य पायाभूत सुविधा, ऑक्सीजनची उपलब्धता, व्हेन्टिलेटर्सव्यतिरिक्त आवश्यक रसद वाढवून कोणत्याही परिस्थितीत मृत्त्यूदर कमी करणे आणि सर्व रुग्णालयांकडून त्याचप्रमाणे घरी उपचाराधीन असलेल्यांकडून वैद्यकीय व्यवस्थापन शिष्टाचारच्या पालनाबाबत खात्री करणे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

प्रतिबंधात्मक उपाय करा

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी या व्यतिरिक्त सक्रिय रुग्णांचा शोध आणि प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी समुदाय स्वयंसेवकांचा सहभाग सुनिश्चित करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राज्यांनी जास्त  रुग्णवाढ असलेल्या ठिकाणी सर्वसमावेशक निर्बंधांसह कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

नवा स्ट्रेन अंदाजीत

काही राज्यात रुग्णसंख्या वाढीत विषाणूच्या नव्या प्रकाराचे नेमके योगदान अंदाजित आहे. महामारी नियंत्रणात आणण्यासाठीच्या उपाययोजना सारख्याच आहेत. या भागात कोविड-19   व्यवस्थापनासाठी विविध प्रोटोकॉलची अंमलबजावणी अधिक गंभीररीत्या करणे गरजेचे आहे.

लसींच्या उत्पादनक्षमतेवरही चर्चा

विद्यमान उत्पादकांची  उत्पादन क्षमता आणि चाचणी सुरु असलेल्या लसींच्या क्षमतेसह लसीचे संशोधन आणि विकास यावर देखील चर्चा करण्यात आली. लस उत्पादक आपली  उत्पादनक्षमता वाढवत आहेत आणि अन्य देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content