स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
आता पळून, पळवून वा संमतीने होणाऱ्या आंतरधर्मीय विवाहांवर राज्य सरकारची म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारची नजर असणार आहे. नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत विवाह, धार्मिक स्थळी करण्यात आलेले विवाह, पळून...
विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२०...
रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातल्या ज्या १९ बंगल्यांचा प्रॉपर्टी टॅक्स उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी डिसेंबर २०२०पर्यंत भरला, ते साडेनऊ कोटी रुपयांचे बंगले...
नागरिकांना पारपत्राबाबतच्या (पासपोर्ट) कामांसाठी लवकरात लवकर भेटीची वेळ (अपॉइंटमेंट) उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून, मुंबईच्या सर्व प्रादेशिक पारपत्र...
मुंबईच्या वैभवात भर घालेल अशाप्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
महाराष्ट्रात सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला तोंड देण्यासाठी हातात हात घेऊन उभी ठाकलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गट (उद्धव ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची...
एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद नव्याने उफाळला असतानाच कर्नाटक राज्यातील मैसूर शहराचे महापौर शिवकुमार व उपमहापौर डॉ. रूपा यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेला सदिच्छा भेट...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता मुंबई महापालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क),...
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८००...