Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या पासपोर्ट कार्यालयांचे...

मुंबईतल्या पासपोर्ट कार्यालयांचे कामकाज येत्या तीन शनिवारीही…

नागरिकांना पारपत्राबाबतच्या (पासपोर्ट) कामांसाठी लवकरात लवकर भेटीची वेळ (अपॉइंटमेंट) उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून, मुंबईच्या सर्व प्रादेशिक पारपत्र कार्यालयांतील कामकाज येत्या तीनही शनिवारी म्हणजेच 10, 17 आणि 24 डिसेंबर 2022 यादिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी साडेपाच या वेळात नियमित स्वरुपात सुरू राहणार आहे.

10 डिसेंबर 2022 यादिवशी पारपत्र कार्यालयातील कामासाठी ऑनलाईन पद्धतीने भेटीची वेळ उपलब्ध आहे तर 17 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 2022 यादिवशीच्या भेटीच्या वेळा अनुक्रमे 14 डिसेंबर आणि 21 डिसेंबर 2022 यादिवशी उपलब्ध होतील.

https://www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज तसेच शुल्क भरून भेटीची नवीन वेळ मिळवण्यासाठी नोंदणी करता येईल. अर्जदाराला पुन्हा याच संकेतस्थळावर लॉग इन करून शुल्क भरले गेल्याची तसेच भेटीच्या वेळेच्या तारखेची खातरजमा करता येईल. भेटीच्या वेळेची निश्चित माहितीदेखील पोर्टलवर मिळेल.

ज्या अर्जदारांना पारपत्राच्या कामासाठी नंतरच्या काळातील भेटीच्या वेळा मिळाल्या आहेत किंवा ज्यांना आधीच्या भेटीच्या वेळेच्या दिवशी कार्यालयात हजर राहणे शक्य झाले नसेल त्यांना उपरोल्लेखित तीन शनिवारी त्यांच्या भेटीच्या वेळेसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना ही तारीख एकदाच बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.   

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content