कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

उस्ताद वसीम अहमद...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२४ या वर्षीचा गानसरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार आग्रा घराण्याचे प्रतिथयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायक कोलकात्याचे उस्ताद वसीम अहमद खान यांना जाहीर...

ब्रिटन रेल्वे आणि...

२०२५मध्ये आधुनिक रेल्वेच्या २००व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रिटनची रेल्वे आणि भारतातील सर्वात मोठी फिल्म प्रोडक्शन कंपनी यशराज फिल्म्स एकत्र येत आहेत. रेल्वे 200, या ऐतिहासिक सोहळ्याचा...

‘कोवळी उन्हे’चा ३००वा...

कथा, कविता, एकपात्री, गीते अशा स्वलिखित साहित्यप्रकारांचे सादरीकरण करून मनोरंजन करणाऱ्या मेघना साने यांच्या देशपरदेशात लोकप्रिय झालेल्या 'कोवळी उन्हे' कार्यक्रमाचा ३००वा प्रयोग सहयोग मंदिर सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी...

‘छबी’तून उलगडणार अनोखी...

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी...

‘इंद्रायणी’चे ३०० भाग...

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "सुनबाई लय भारी" या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच लाँच केले. महिला सबलीकरणावर आधारित गोवर्धन दोलताडे निर्मित व शिवाजी दोलताडे दिग्दर्शित...

जयवंत दळवी जन्मशताब्दी...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने साहित्यातील प्रेमरंग, या विषयावर साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या शनिवारी, ८ फेब्रुवारी आणि रविवारी,...

जेव्हा पपेट्सने गाजवला...

एक स्वप्न सत्यात उतरलं, जेव्हा शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमने- कौस्तुभ, सुषांत आणि कैलाश यांनी प्रसिद्ध कोल्ड प्ले...

अनन्या, पाँडिचेरी, सनी,...

सन 2022 या वर्षातल्या साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मॅन, समायरा, गाभ,...
Skip to content