Homeकल्चर +'बाईपण भारी देवा'...

‘बाईपण भारी देवा’ पुन्हा प्रदर्शित होणारा पहिलावहिला मराठी चित्रपट!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ पुन्हा सिनेमागृहांत रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट, आतंरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त म्हणजेच ७ मार्चपासून आपल्या सख्यांना भेटायला येत आहे. २०२३मध्ये रिलीज होताच या चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन तब्बल ७६.५ कोटींचं होतं, तर सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनानंतर यानं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेतच त्यात अजून एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा अलिकडच्या काळातील हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले, तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृतीविषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटर्समध्ये चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत. यातील अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आता प्रदर्शित झालेल्या ‘छावा‘या चित्रपटाबरोबर ‘बाईपण भारी देवा‘चा ट्रेलर दिसणार आहे. आणि म्हणूनच निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपट पुनः रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी आमच्या संपूर्ण टीमवर केलेला प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूपच स्पेशल आहे. जिओ स्टुडिओजच्या सहयोगाने आता पुनः तो उत्सव सिनेमागृहांत अनुभवता येणार आहे. महिला दिनानिमित्त पुन्हा प्रेक्षक आवर्जुन सिनेमागृहांत आपल्या सख्यांना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिलाय ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामिल होतील अशी मला खात्री आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले तसेच ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब चौधरी आणि सुकन्या कुलकर्णी मोने अभिनीत, साई – पियूषद्वारे संगीतबद्ध केलेले संगीत, वैशाली नाईकद्वारे लिखित आणि केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यावर कोणता विक्रमन करतो ते पाहायचे..

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content