Homeटॉप स्टोरीभाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र...

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण अमित शाहांच्या दरबारी! मध्यरात्रीनंतर गुफ्तगू!!

महाराष्ट्रातल्या मुंबईसह अनेक महापालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला कसे सामावून घ्यायचे यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली. मध्यरात्रीनंतर झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये या विषयावर साधारण पाऊण ते एक तास चर्चा झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच यासंदर्भात नागपूरमध्ये आगामी निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. नगर परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगवेगळे लढल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती अशा अनेक महत्त्वांच्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला सत्तेबाहेर ठेवायचे असेल तर युतीशिवाय पर्याय नाही, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. मात्र, युतीत राहताना जागावाटपात सन्मानजनक जागावाटप होईल, याची काळजीही घेण्याचे दोन्ही नेत्यांनी ठरवल्याचे सूत्रांनी सांगितले. संभाव्य जागावाटपाच्या सूत्रावरही यावेळी ढोबळ मानाने चर्चा झाल्याचे कळते. या चर्चेनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शाहांच्या भेटीसाठी दिल्ली गाठल्याचे बोलले जाते. फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा गोषवारा यावेळी शाहांकडे सोपवण्यात आल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

सध्या महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी आहे. परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच विदर्भातल्या काही महापालिकांमध्ये राष्ट्रवादीने महायुतीच्या विरोधात निवडणुका लढविण्याचे ठरवले आहे. या प्रक्रियेत काही ठिकाणी राष्ट्रवादी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्याचीही शक्यता आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्याचे कळते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालच्या शिवसेनेचे काय करायचे यावर अजूनही मार्ग निघालेला नाही. त्यातच महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) घ्यायचे की नाही याबद्दलही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीत मनसेचा समावेश झाला नाही तरी शिवसेना (उबाठा) मात्र मनसेबरोबर आघाडी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

दरम्यान, ऱाष्ट्रवादी (शप)चे प्रमुख शरद पवार येत्या १२ डिसेंबरला वयाची ८५ वर्षे पूर्ण करत आहेत. राष्ट्रवादी एकसंघ असताना त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळही आता संपत आला आहे. सध्या सुरू असलेले राज्यसभेचे अधिवेशन त्यांचे या कार्यकाळातले शेवटचे अधिवेशन आहे. पुन्हा राज्यसभेवर जायचे असल्यास त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीचे एक सक्रीय नेते म्हणूनही शरद पवार यांना आपले स्थान भक्कम ठेवायचे आहे. या प्रयत्नात काल संध्याकाळी म्हणजेच वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी चहापानाचे आयोजन केले होते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. फारूख अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, राहुल गांधी, सोनिया गांधी, पी. चिदंबरम असे अनेक नेतेही या कार्यक्रमात आवर्जून हजर होते. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदेही या समारंभात सहभागी झाले होते.

Continue reading

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये...

ओss जादूगर…

ए जादूगर.. तेरे नयना.. दिल जाएगा बच के कहाँ?... संजीव कुमार आणि वहिदा रहमान यांचे १९७१मधल्या मनमंदिर, चित्रपटातले सदाबहार गीत आजही प्रत्येकाला भुरळ घालते. या गीताचीच परवा आठवण झाली, जेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देश्यून...

राजीनाम्याची हूल देणाऱ्या ठाकरेंच्या आमदारकीला आज निरोप!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र,...
Skip to content