Homeकल्चर +उत्तरा केळकर यांना...

उत्तरा केळकर यांना अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. उद्या, शनिवारी 10 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल व त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होईल. हा समारंभ अनुराधा पौडवाल यांच्या मुंबईतल्या खार (पश्चिम) येथील राहत्या घरी संपन्न होणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये 51,000 /- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे हे यंदाचे 28वे वर्ष आहे. आजवर या पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर पुढीलप्रमाणे- पार्श्वगायक- जी. मल्लेश, संगीतकार- राम कदम, यशवंत देव, प्रभाकर जोग, दत्ता डावजेकर, अशोक पत्की, संगीत संयोजक- श्यामराव कांबळे, तालवादक- जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूरवादक- उल्हास बापट, गीतकार- जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, भावगीत गायक- अरुण दाते, गिटारवादक- रमेश अय्यर, सुनील कौशिक, ध्वनिमुद्रक- डी. ओ. भन्साळी, अविनंदन टागोर, हेमंत पारकर, सत्येन पौडवाल, युवा गायक- गिरीश संझगिरी, चंद्रशेखर महामुनी, मदन काजळे, त्यागराज खाडिलकर.

ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचा परिचय-

उत्तरा केळकर यांनी अर्थशास्त्र या विषयात B. A.ची पदवी घेतली असून मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय रागदारी संगीत शिक्षण घेतले तर सुगम संगीताचे शिक्षण मराठीमधील ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव व श्रीकांत ठाकरे यांच्याकडे घेतले. त्यांच्या गायन कारकिर्दीला 53 वर्षे पूर्ण झाली असून या कालावधीमध्ये आजवर त्यांनी 12 विविध भाषांमध्ये 425हून अधिक चित्रपटांसाठी, 650हून अधिक कॅसेट्स व सीडीजसाठी तसेच अनेक शॉर्ट फिल्म्स, जाहिराती व जिंगल्ससाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांच्या गायन कारकिर्दीवर आधारित “उत्तर रंग” हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले असून त्यांनी त्यांच्या गायनाचे देशात व परदेशात अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत.

उत्तरा केळकर यांची गाजलेली काही गीते-

01 सत्यम शिवम सुंदरा – सुशीला – राम कदम
02 अग नाच नाच राधे – गोंधळात गोंधळ – विश्वनाथ मोरे
03 झन झन नन छेडील्या तारा – हळदी कुंकू – विश्वनाथ मोरे
04 भन्नाट रानवारा – कशासाठी प्रेमासाठी – सुधीर मोघे
05 मंदिरात अंतरात तोच – धाकटी सून – सुधीर फडके
06 गडद जांभळ भरलं आभाळ – एक होता विदुषक – आनंद मोडक
07 येशील येशील राणी – पोरींची कमाल बापाची धमाल – यशवंत देव
08 कुणीतरी येणार येणार ग – अशी ही बनवा बनवी – अरुण पौडवाल
09 बहिणाबाई ची गाणी – यशवंत देव
10 देवांचाही देव करितो – आई – विश्वनाथ मोरे
11 बिलन शी नागीन निघाली – परिश ठाकूर
12 अशी चिक मोत्याची माळ – परेश शाह
13 चला जेजुरी ला जाऊ – नवरा माझा नवसाचा – जितेंद्र कुलकर्णी

मिळालेले सन्मान व पुरस्कार-

महाराष्ट्र राज्य शासनाचा “सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार” – 2 वेळा
सूर सिंगार संसदचा प्रतिष्ठित “मिया तानसेन पुरस्कार”
उमेद पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, राम कदम पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार इ.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content