Homeडेली पल्सआधार कार्डाशी संबंधित...

आधार कार्डाशी संबंधित कोणतीही तक्रार सोडवली जाईल एका कॉलवर!

सार्वजनिक सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नागरिकांना अखंड सहाय्य प्रदान करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) 1947 क्रमांकाची ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ म्हणजेच दूरध्‍वनीमार्फत मोफत मदतसेवा सुरू केली आहे. आधारशी संबंधित समस्या, प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाइन चोवीस तास सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्वरित सहाय्य मिळविण्यासाठी सोयीची ठरणार आहे.

ही परिचलन स्वयं सहाय्य सेवा आठवड्याचे सर्व दिवस चोवीस तास स्वयं सहाय्य पद्धतीने (सेल्फ सर्व्हिस) उपलब्ध आहे. टोल-फ्री हेल्पलाइन 1947 ही नागरिकांचे आधारशी संबंधित विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जन्मतारीख, नाव, मोबाईल क्रमांक किंवा पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील अद्ययावत करणे असो, की पीव्हीसी कार्डबद्दल माहिती शोधणे असो, ही हेल्पलाईन, आधार बाबतच्या कोणत्याही चौकशीसाठी सर्वसमावेशक उपाय आहे. त्याशिवाय, या हेल्पलाईनच्या मदतीने नागरिकांना त्यांच्या EID/UID ची सद्यःस्थिती तपासता येईल, घर नोंदणी सेवांसाठी सहाय्य मिळेल, आणि अद्ययावतीकरणाची विनंती फेटाळली गेली, तर त्यामागचे कारण समजू शकेल.

या सेवेचा वापर करण्यासाठी, नागरिक त्यांच्या लँडलाइन किंवा मोबाईल फोनवरून 1947 क्रमांक डायल करू शकतात. ही हेल्पलाईन 12 भाषांमधील संवादासाठी सक्षम असून, सहाय्य मिळवण्यासाठी भाषेचा अडथळा ठरणार नाही, हे सुनिश्चित करते. वापरकर्त्यांकडे स्वयंचलित IVRS प्रणाली द्वारे मार्गदर्शन मिळवण्याचा किंवा वैयक्तिक सहाय्य मिळवण्यासाठी आधार केअर एक्झिक्युटिव्हशी थेट संपर्क साधण्याचा पर्याय उपलब्ध असेल.  

अद्ययावतीकरणाची विनंती नाकारली गेली, तर 1947 क्रमांकार कॉल करून नकाराचे कारण जाणून घेता येईल, आणि पुन्हा विनंती करण्यापूर्वी आवश्यक ती सुधारणा करण्याचा मार्ग उपलब्ध राहील. कॉल केल्यावर, नागरिकांना एसएमएसद्वारे संवाद क्रमांक त्वरित जारी केला जातो, ज्याच्या सहाय्याने ते आपल्या तक्रार निवारणाबाबतच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतील. याशिवाय, आधार कार्ड एक्झिक्युटिव्हबरोबर हा संवाद क्रमांक सामायिक करून तक्रारीची सद्यःस्थिती तपासता येईल.

ज्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संवाद करायचा आहे, त्यांना आपले प्रश्न, अभिप्राय, सूचना आणि तक्रारी देखील पुढील ईमेलवर पाठवता येतील. help@uidai.gov.in.   

त्याशिवाय पुढील अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दखल करता येईल : https://myaadhaar.uidai.gov.in/file-complaint.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content