Homeन्यूज ॲट अ ग्लांसअखेर इराणपुढे अमेरिकेने...

अखेर इराणपुढे अमेरिकेने हात टेकले! युद्धविराम!! शुक्रवारी पाकिस्तानात चर्चा!!!

४८ तासांत होर्मूझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराण बेचिराख करू, असा अत्यंत गंभीर इशारा देणाऱ्या अमेरिकेने अखेर इराणपुढे हात टेकले. इराणच्या १० अटींच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्याचे मान्य करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांकरीता एकतर्फी युद्धविराम घोषित केला. यानंतर चीनच्या विनंतीनंतर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनीही १५ दिवसांच्या युद्धविरामाला मंजुरी दिली. या काळात होर्मूझ सामुद्रधुनीवर इराण आणि ओमानचे नियंत्रण राहील. त्याचप्रमाणे तो सर्वांसाठी खुला केला जाईल. येत्या शुक्रवारी १० एप्रिलला पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेचे प्रतिनिधी कायमस्वरूपी युद्ध थांबविण्याच्या दृष्टीने चर्चा करतील.

इराण

गेल्या २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर लष्करी कारवाई सुरू केली. इराणने आण्विक कार्यक्रम सोडून द्यावा. संवर्धित युरेनियम आमच्या हवाली करावे अशा विविध अटी समोर ठेवत अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ले सुरू केले होते. गेले ४० दिवस हे हल्ले चालू आहेत. मात्र, इराणने अमेरिकेच्या सर्व इशाऱ्यांना केराची टोपली दाखवली. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई यांच्यासह ५०हून अधिक वरिष्ठ नेते आणि अधिकारी मारले गेले. याच काळात खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांनी सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनीही अमेरिकेचा कडवा प्रतिकार केला. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्याला उत्तर देताना इराणने आजूबाजूच्या १० आखाती राष्ट्रांतल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. इतकेच नव्हे तर युएई, सौदी अरेबिया, कुवेत, बाहरीन, ओमान आदी देशांमधली महत्त्वाची ठिकाणे, अमेरिकी कंपन्यांनाही इराणने लक्ष्य करण्यास सुरूवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या साऱ्या आखाती देशांच्या आयात-निर्यातीसाठी असलेला समुद्री मार्ग म्हणजे होर्मूझची सामुद्रधुनी इराणने बंद केली. त्यामुळे या राष्ट्रांकडून होणारी तेलाची निर्यात थंडावली. या राष्ट्रांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंसह अन्य गोष्टींच्या आयातीलाही रोक लागली. होर्मूझची सामुद्रधुनी बंद राहिल्यामुळे युरोपिय देशही कासावीस झाले. नाटो, या संघटनेच्या छताखाली एकत्र असणारे नॉर्वे, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली आदी देशांनीही होर्मूझची सामुद्रधुनी लवकरात लवकर खुली व्हावी असे प्रयत्न चालवले होते. तेलाच्या भडकत्या किमती, अमेरिकेत दिवसेंदिवस घटत चाललेली ट्रम्प यांची लोकप्रियता, आखाती देशांकडून येत असलेला दबाव लक्षात घेता इराण नष्ट करण्याचा गंभीर इशारा देणाऱ्या अमेरिकेने शेवटी दिलेली ४८ तासांची मुदत संपतासंपताच १५ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली.

इराण

युद्धविरामासाठी ट्रम्प उतावळे असले तरी इराण मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम होता. अखेर चीनच्या मध्यस्थीनंतर इराणने युद्धविरामाला तयारी दाखवली. अमेरिका व इस्त्रायलकडून हल्ले झाले नाहीत तर इराणकडूनही प्रतिहल्ला करणार नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांनी स्पष्ट केले. युद्धविरामाच्या काळात इराण होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यास तयार झाल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले, तर तशी विनंती सेनेला केली जाईल, असे इराणने म्हटले आहे. होर्मूझच्या सामुद्रधुनीवर इराण आणि ओमानचा अधिकार राहील. या मार्गावरून येजा करणाऱ्या जहाजांकडून टोलवसुली केली जाईल. लष्करी कारवाईत झालेल्या नुकसानीची भरपाई अमेरिका करेल, इराण अण्वस्त्र बनविणार नाही मात्र, इराण युरेनियम संवर्धन करण्याचा कार्यक्रम चालू ठेवेल, अशा विविध १० अटी इराणने अमेरिकेसमोर मांडल्या आहेत. यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन अमेरिकेकडून देण्यात आले असून येत्या १० एप्रिलला इस्लामाबादमध्ये इराण तसेच अमेरिकेच्या प्रतिनिधींमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ट्रम यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्चा तेलाचे दर तब्बल ९ टक्क्यांनी उतरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content